जिल्ह्यात पाच डेपोंवर 61 हजार ब्रास वाळू उपलब्ध, खरेदीसाठी नागरीकांनी नोंदणी करावी...!

 0
जिल्ह्यात पाच डेपोंवर 61 हजार ब्रास वाळू उपलब्ध, खरेदीसाठी नागरीकांनी नोंदणी करावी...!

जिल्ह्यात पाच डेपोंवर 61 हजार ब्रास वाळू उपलब्ध;

खरेदीसाठी नागरिकांनी मागणी नोंदवावी...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.6(डि-24 न्यूज)- जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी , नागरिकांसाठी, खाजगी प्रकल्प आणि शासकीय कामांसाठी लागणाऱ्या वाळूची डेपोनिहाय उपलब्धता जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत पाच डेपोंवर सर्व मिळून 61 हजार 077.01 ब्रास वाळू उपलब्ध आहे. ही वाळू रितसर मागणी नोंदवून व शुल्क भरुन उपलब्ध आहे. घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना बांधकाम योग्य वाळू खरेदीसाठी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत वाळू घाट व वाळू डेपो येथे उपलब्ध वाळूबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच वाळू खरेदीबाबत सुचनाही जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी दिल्या आहेत. 

त्यानुसार वाळू खरेदीसाठी ग्राहकास सेतु केंद्र छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय आवार किंवा सर्व तहसिल कार्यालयाचे सेतु व इतर 145 सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. गरजेनुसार नागरिकांनी वाळु खरेदीसाठी मागणी नोंदवावी. 

घरकुल लाभार्थी व सर्वांना वाळूची नोंदणी करतांना 25 रुपये सेतु नोंदणी शुल्क जमा करावे लागेल. नोंदणी करतांना रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल प्रमाणपत्र बांधकाम परवानगी सोबत आवश्यक घेऊन यावे. तसेच नोंदणी करतांना मोबाईल क्रमांक अनिवार्य असून OTP साठी मोबाईल सोबत घेऊन यावेत. घरकुल योजनेतील लाभार्थी यांना 5 ब्रास वाळू मोफत मिळेल.

एका कुटुंबास एका वेळी कमाल 10 ब्रास इतक्या मर्यादेत वाळू मिळेल. नंतर वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर वाळूची मागणी ग्राहकास करता येईल. नोंदणी झाल्यानंतर बुकींग ID असलेली पावती प्राप्त करुन सदर पावती वाळु डेपोवरील डेपोमॅनेजरला दाखवून वाहतुक पावती प्राप्त (ETP) करुन घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी केलेल्या व्यक्तीची राहील. शासनाच्या अधिकृत वाळू डेपो वरुन वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी महाखनिज वेबसाइटवर ट्रापोर्टर म्हणून करणे गरजेचे आहे. सदर वाहनांवर AIS-140(IRNSS) प्रमाणिकरण असलेली जीपीएस यंत्रणा आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

डेपोनिहाय वाळू उपलब्धता

ब्रम्हगाव ता. पैठण- नागरिकांसाठी 3590.70 ब्रास, बुकिंगसाठी प्रतिब्रास शुल्क 2022.02 रुपये.

हिरडपुरी ता. पैठण-घरकुल लाभार्थ्यांसाठी 10600.08 ब्रास, नागरिकांसाठी 23851.08 ब्रास, खाजगी प्रकल्पांसाठी 10600.08 ब्रास, शासकीय कामांसाठी 7950.06, बुकिंगसाठी प्रतिब्रास शुल्क 807.02 रुपये. 

गेवराई गुंगी ता. फुलंब्री- नागरिकांसाठी 2019.24, बुकिंगसाठी प्रतिब्रास शुल्क 1572.02 रुपये.

मोढा खु. ता. सिल्लोड- घरकुल लाभार्थ्यांसाठी 159.11 ब्रास, नागरिकांसाठी 899.49 ब्रास, बुकिंगसाठी प्रतिब्रास शुल्क 2454.02 रुपये.

डाग पिंपळगाव ता. वैजापूर- नागरिकांसाठी 1407.17 ब्रास, बुकिंगसाठी प्रतिब्रास शुल्क 1311.02 रुपये. 

एकूण जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी 10 हजार 759.19 ब्रास, नागरिकांसाठी 31 हजार 767.68 , खाजगी प्रकल्पांसाठी 10600.08 ब्रास तर शासकीय कामांसाठी 7950.06 ब्रास अशी वाळू उपलब्धता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow