दिव्यांग कल्याण योजनांचा नीधी वेळेत खर्च करा - उपजिल्हाधिकारी संगीता राठोड

जिल्हास्तरीय दिव्यांगत्व कल्याण समिती आढावा बैठक...
दिव्यांग कल्याण योजनांचा निधी वेळेत खर्च करा- उपजिल्हाधिकारी राठोड
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज):-जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला 5% निधी वेळेत खर्च करून दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळून द्यावा, अशी सूचना सामान्य प्रशासन विभगाच्य उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी केली.
दिव्यांगत्व कल्याण जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदचे समाज कल्याण अधिकारी एस.बी.चव्हाण, महानगरपालिकेचे समाज कल्याण विभागाचे उपायुक्त लखीचंद चव्हाण, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. महेश लड्डा, व अन्य समिती सदस्य उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समितीने दिव्यांग कल्याणसाठी जिल्हा परिषदअंतर्गत निर्धारित पाच टक्के निधीच्या खर्चावर योग्यपणे देखरेख ठेवून दिव्यांगांना याचा लाभ मिळवून द्यावा. दिव्यांगांच्या सुविधांबाबत येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन सुविधा उपलब्धतेची उपाययोजना करावी, शासकीय सेवेत असणाऱ्या दिव्यांगांच्या अडीअडचणी, तक्रारीची दखल समितीने घेऊन योग्य ती कारवाई करावी. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक तसेच पुनर्वसन व सेवा सुविधांसाठी जाणीव जागृती करावी. दिव्यांगांसाठी विनाअट घरकुलांचा लाभ द्यावा. निराधार निराश्रीत व अति तीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता द्यावा. अस्थिव्यंग व्यक्तींना स्कूटर अतिरिक्त सुविधेसह उपलब्ध करून द्यावी. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या 10 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी. कर्णबधिर, अंध, अस्थिव्यंग या लाभार्थ्यांचे वेळेत प्रस्ताव सादर करून बँकेकडून परिपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात यावी. शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरीत करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
What's Your Reaction?






