जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप

जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे माजी सैनिकाच्या पाल्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) जिल्हा सैनिक कार्यालयतर्फे माजी सैनिक व त्यांच्या पाल्य यांना शिक्षण व रोजगारासाठी आर्थिक मदत जिल्हा सैनिक कल्याण निधी अंतर्गत देण्यात येते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते संदीप भगवान लोणारी यांना स्वयंरोजगारासाठी 3 लाख रुपये, विजय निवृत्ती देशमुख यांच्या पाल्यास परदेशी शिक्षणासाठी 50 हजार रुपये जनार्दन काकाजी गवळी यांच्या पाल्यास 50 हजार तसेच राजू पवार यांच्या पाल्यास 50 हजार रुपये मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सय्यदा फिरासत उपस्थित होत्या.
What's Your Reaction?






