मुस्लिम धार्मिक स्थळावर विद्यापीठ अतिक्रमण करत असल्याचा आरोप...!
मुस्लिम धार्मिक स्थळावर विद्यापीठ अतिक्रमण करत असल्याचा आरोप...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.31(डि-24 न्यूज) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या दर्गा, मस्जिद, कब्रस्तान, मकबरावर अतिक्रमण करत असल्याचा गंभीर आरोप शेख मोहम्मद खुर्रम अब्दुल रशीद साब यांनी केला आहे.
त्यांनी पुढे सांगितले याचे भक्कम पुरावे व कागदपत्रे आमच्याकडे आहे. विद्यापिठात 12 धार्मिक स्थानांची अतिक्रमण समोर आले आहे. मुस्लिम धार्मिक स्थळ शेकडो वर्षांपासून आहे याची नोंद वक्फ बोर्डाच्या गजिटमध्ये असताना हे धार्मिक स्थळ अतिक्रमण असल्याचा कमिटी दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यासंदर्भात स्थापन उपससितिने मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी पाहणी केली. यासंदर्भात सविस्तर अहवाल समितीकडे पाठवला जाणार आहे. अतिक्रमण संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणांच्या विषयावर पोलिस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त व कुलगुरू अशा तीन जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने उपसमिती स्थापन केली आहे. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळ, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, विद्यापिठाचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे. एका वर्तमानपत्रात 21 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या बातमीने धक्का बसला. विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वी पासून म्हणजे 150 ते 200 वर्षांपासून या जमिनीवर मस्जिद, दर्गा, कब्रस्तान व मकबरा आहे. विद्यापिठाची स्थापना 1958 साली झाली. विद्यापीठ परिसरातील जागा ही विद्यापिठाने अतिक्रमण वक्फच्या जागेवर केलेले आहे. विद्यापिठाने जी जागा घेतली त्यानंतर बाजूची जागा वक्फची दर्गा, मस्जिद, कब्रस्तान, मकबरा यांचे महाराष्ट्र राज्य वक्फ म़ंडळाकडे सर्व पुरावे व कागदपत्रे आहे. विद्यापिठाने ज्या लोकांकडून या ठिकाणी जमीन घेतलेली आहे त्या लोकांचा या जमिनीशी काहीच संबंध नव्हता अशा लोकांकडून विद्यापिठाचे ही जमीन घेतलेली आहे. वक्फ बोर्डाने ही जागा विद्यापिठाला दिली नाही. मुतवल्ली किंवा अध्यक्षांनी विद्यापिठाला जागा दिलेली नाही म्हणून समिती व उपसमितीला आम्ही या विषयावर सविस्तर निवेदन देणार आहे. याबद्दल समाजाने जागृत होत हि जागा वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
वक्फ मंडळ विद्यापीठ परिसरातील वक्फ संस्थांची पाहणी, देखभाल दुरुस्ती करत नाही. दुर्लक्ष केले जात आहे. म्हणून विद्यापीठ परिसरातील मस्जिद,दर्गा, कब्रस्तान, मकबरा तोडून वक्फ संपत्तीवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप केला. यापूर्वी कब्रस्तानात खोदकाम करत असताना हि कामे जमावाने बंद पाडले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विरुद्ध अहेमद करीम खान सिव्हिल रिव्हिजन अप्लिकेशन नं.44/2023 दाखल केलेली होती....
मौजे जयसिंगपूरा औरंगाबाद येथील दर्गा हजरत मददगार साहेब संबंधी जमीन हि शुध्द वक्फ नोंदणीकृत मालमत्ता आहे. मा.वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे सदरहू वक्फ जमगनिचे प्रकरण क्रमांक 3/2012 प्रलंबित आहे. या दरम्यान अनेक सुनावणी झाली. दि.17/2/2023, 22/2/2023, 3/3/2023, 9/3/2023 रोजी मा.वक्फ न्यायाधिकरणाने आदेश झाला आणि कामाचा व्याप जास्त असल्याने आदेशाची प्रत 14/3/2023 रोजी आदेशाची प्रत घेऊन जावी असे सांगितले. विवादीत ठिकाणी कोणतेही बांधकाम न करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. आपला अतिक्रमण करण्याचा डाव फसणार असे लक्षात येताच विद्यापीठ प्रशासनाने हे प्रकरण दि.9/3/2023 रोजी उच्च न्यायालयात दाखल करुन अवैध बांधकाम प्रयत्न केला असला मात्र सिव्हिल रिव्हिजन अप्लिकेशन नं.44/2023 दि.24/3/2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.( आदेश क्रमांक सी आर एस/44/2023 ) तरी देखील विद्यापीठ प्रशासन आदेशाची पायमल्ली करून वक्फ मिळकतीवर अतिक्रमण करून बांधकाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
शहराचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असताना मुस्लिम कब्रस्तानात बुलडोझर चालवून उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्यास शहरात धार्मिक विद्वेष वाढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
विद्यापीठ गेट जवळ 3/1,3/2, दोन व गट नं.47 फुट मकबराच्या बाजूची मस्जिदचे कागदपत्रे आहे.
दोन सातबारा C.R.A.No.44/2023 मा.उच्च न्यायालयाचे आदेश. हजरत ख्वाजा सय्यद शाह महेमूद दर्गा 31 गुंठे, सर्वे नं.41, 3 एकर 37 गुंठे हजरत इस्माईल शाह सि.टी.एस.394, 395, 235 महेमूद शाह 394 कब्रस्तान 395, 235 हे पुरावे आहेत याची नोंद वक्फ मंडळात आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्र वक्फ मोव्हमेंटचे अध्यक्ष रियाजोद्दीन देशमुख, एड शफीक अहेमद, तारेक अहेमद खान, मिर्झा खलील बेग, शेख फजलोद्दीन, एड अब्दुल हकीम खान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?