मोदी सरकारने नारायण राणे यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करावी, काँग्रेसचे अक्रामक आंदोलन

 0
मोदी सरकारने नारायण राणे यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करावी, काँग्रेसचे अक्रामक आंदोलन

मोदी सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपटटी करावी - शेख युसूफ यांची मागणी  

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) काल भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंन्दु धर्माचे सर्वोच्च आचार्य शंकराचार्य यांचे योगदान काय असा प्रश्न विचारून शंकराचार्य व तमाम हिंदु धर्माचा अपमान केला आहे. काँग्रेस पक्ष शंकराचार्य यांचा अपमान सहन करणार नाही. याचा निषेध करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौक येथे भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध म्हणून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात नारायण राणे माफी मांगो, नारायण राणे मुर्दाबाद, नारायण राणे हाय हाय, नारायण राणे यांना तात्काळ अटक् करून मंत्री मंडळातून बरखास्त करा व हिंदु धर्म व शंकराचार्य यांची माफी मांगा अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी पत्रकारांशी बोलतांना मागणी केली. जर नारायण राणे यांनी शंकराचार्य व हिंदु धर्माची माफी मागणीतली नाही तर नारायण राणे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून या पेक्षा मोठे आंदोलन करून असा इशारा शेख यूसुफ यांनी दिली.  

 यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, अ‍ॅड.इकबाल सिंग गिल, मोहन देशमुख, हेमा पाटील, अनिस पटेल, आकेफ रजवी, डॉ.अरूण शिरसाठ, उमाकांत खोतकर, सागर नागरे, , डॉ.निलेश अंबेवाडीकर, आसमत खान,अनिल माळोदे, शेख रईस, अशोक डोळस, अजय डिंडोरे, महेंंद्र रमंडवाल, मंजु लोखंडे, अनिता भंडारी, शकुंतला साबळे, बाबुराव कवसकर, चंद्रप्रभा खंदारे, योगेश थोरात, प्रा.शिलवंत गोपनारायण, श्रीकृष्ण काकडे, सविता म्हस्के, मुददसिर अन्सारी, माधवी चंद्रकी, विद्याताई घोरपडे विशाल बन्सल, रवि लोखंडे, दिक्षा पवार ॲड सुभाष देवकर, सयद युनुस, अमजद खान, उत्त्तम दणके, आकाश रगडे, संतोष भिंगारे, शिवा गवळी, साहेबराव बनकर, नंदु अंभोरे, जाफर शेख, सयद फयाजोददीन, सलीम शेख, अलंकृत येवतेकर, कृष्णा भंडारी, शाहुराज कांबळे, सुभाष जाधव, अंकुश आगे, दिव्यांग सेलचे आकाश, हबीब शेख, राजरत्न म्हस्के, नंदा घोरपडे, परवीन देशमुख बरखा विंचूरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow