आमदार झाल्यानंतर शहरात अंबादास दानवे यांचे आगमन व भव्य स्वागत...!

 0
आमदार झाल्यानंतर शहरात अंबादास दानवे यांचे आगमन व भव्य स्वागत...!

विधान परिषद सदस्य झाल्यानंतर अंबादास दानवेंचे छत्रपती संभाजीनगरात भव्य स्वागत

छत्रपती संभाजीनगर, दि.6(डि-24 न्यूज)-: महाराष्ट्र विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन होताच शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शहरात भव्य रॅली काढत दानवे यांचे स्वागत करण्यात आले.

रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसने आगमन झाल्यानंतर दानवे यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक या मार्गावर फोर व्हीलर रॅली काढण्यात आली. यावेळी रेल्वे स्टेशन, कोकणवाडी चौक, गोपाल टी, जे टॉवर आणि एसएससी बोर्ड चौक येथे पुष्पहार घालून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

शिवसेना जिंदाबाद...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो....हा आवाज कुणाचा - शिवसेनेचा.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.

शिवसैनिकांनी गुलाल उधळत उत्साहात जल्लोष साजरा केला. हातात भगवे झेंडे घेऊन “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. ढोल-ताशांच्या गजरात रॅली पुढे सरकत क्रांती चौकात पोहोचली. 

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.

या स्वागत सोहळ्यात शिवसैनिकांसह मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक, महिला व माता-भगिनी सहभागी झाल्या होत्या. नाचत-गात जल्लोषात झालेल्या या स्वागतामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण

झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow