ना पक्ष ना संघटना ना झेंडा तरीही तरुण नव्या दमाचे नेतृत्व उदयास आल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या...!

 0
ना पक्ष ना संघटना ना झेंडा तरीही तरुण नव्या दमाचे नेतृत्व उदयास आल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या...!

ना राजकीय पक्ष, ना झेंडा ना संघटना तरीही शहरात नवीन चेहरा उदयास

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.22(डि-24 न्यूज) राजकीय नेत्यांच्या यशात राजकारणात पुढे जाण्यासाठी राजकीय वारसा, नेता व राजकीय पक्ष किंवा संघटना असल्याशिवाय यश मिळत नाही असे आतापर्यंत अनुभव आला आहे. एखाद्या नेत्यांचे आशिर्वाद, एखाद्या पक्षाचा झेंडा व पद मिळाले की झाले पुढारी. परंतु ना काही राजकीय वारसा ना पक्ष ना नेता ना झेंडा असल्याशिवाय शहरात एक नवीन उच्चशिक्षित चेहरा पुढे येताना दिसत आहे त्याची सुरुवात झाली अशी काँग्रेस पक्षाचे कार्यालय असलेल्या गांधी भवन येथे विद्यमान आमदार असलेल्या जिल्हाध्यक्षांनी पक्षावर नाराज होऊन राजीनामा दिल्यानंतर पक्ष कार्यालयातील खुर्च्या पळवल्या. एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे खुर्च्या नाही कार्यकर्ते सैरावैरा झाले. एका निष्ठावंत कार्यकर्त्यांला माहिती मिळताच त्याने कोणताही विलंब न लावता शेकडो नवीन खुर्च्या तात्काळ पक्ष कार्यालयात आणल्याने माध्यमात ब्रेकिंग न्यूज बनली. तो कार्यकर्ता एवढ्यावरच न थांबता पक्षाने तिला थेट दिल्लीतून कोरोना काळात शहर जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली. शहरात काँग्रेस कमकूवत असताना त्याने नवी शक्कल लढवली. कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांना जोडण्यासाठी गांधीभवनचे रंगरंगोटी व रिनिव्य्यूशन करुन चकाचक केले व पक्षात हजारो नवीन लोकांना प्रवेश करून घेतले. जुने जेष्ठ नेते जे पक्षाचे काम न करता घरी बसलेले असताना त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम केले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. पक्ष माध्यमातून जनकल्याणाचे कार्यक्रम राबवले, सामन्य जनतेचे प्रश्ण सोडविण्यासाठी पक्ष माध्यमातून प्रयत्न केले l अचानक शिवसेनेत बंड झाले, 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने ठाकरेंचे सरकार अल्पमतात आले असताना औरंगाबाद व उस्मानाबाद चे नामांतराचा निर्णय घाईगडबडीत घेतला. औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर झाले यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत असल्याने काँग्रेस शहर अध्यक्षपदाचा आपल्या शेकडो पदाधिकारी सोबत राजिनामा दिला. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी दिल्लीतून जेष्ठ नेत्यांचे फोन खनखनले. ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव बदलू नये अशी ठाम भूमिका असल्याने त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही. त्यानंतर पक्षाच्या पदाचा त्याग केल्यानंतर ते शांत बसले नाही. औरंगाबाद नामांतर विरोधात बाॅम्बे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दोन वर्ष न्यायालयीन लढा स्वखर्चाने सुरू ठेवला. न्यायालयाने दोन वर्षांनंतर नामांतर विरोधातील सर्व याचिका फेटाळले. त्यानंतर खचून न जाता औरंगाबादचा जुन्या इतिहासाचे अभ्यास रात्रंदिवस झोपेची तमा न बाळगता सुरू ठेवला व सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दिल्ली गाठून दाखल केली. राजकारणात अनेक पक्षांकडून विविध पदांची अमिष दाखवले. आपण नामांतराचा मुद्दा सोडा एमएलसी देण्यात येईल हि मागणीही फेटाळली व औरंगाबादकर म्हणून शहरात ओळख मिळवली व हे नाव वाचवण्यासाठी कुटुंबाचीही पर्वा न सर्वस्व पणाला लावले. यासोबतच ना पक्ष ना पद असताना सोबतच शहरात अविरत समाजसेवा सुरू ठेवली. आता विधानसभा निवडणुक जवळ येत आहे. इच्छूकांनी विविध पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू केली. नामांतराच्या लढाईत लोकप्रियता वाढलेली असताना शहरातील जनतेला नवीन चेहरा, तरुण नेतृत्व, नवीन पर्याय म्हणून या विधानसभेच्या रिंगणात उच्चशिक्षित असलेले मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी उतरावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. ना राजकीय पक्ष ना संघटना असताना त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्याने त्यांना निवडून आणू अशी इच्छा व्यक्त करताना लोक दिसत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow