शहरात वाढत आहे डेंग्यू, चिकुनगुनिया वाढत आहे, सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

 0
शहरात वाढत आहे डेंग्यू, चिकुनगुनिया वाढत आहे, सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

महानगरपालिकेच्या डेंग्यू, चिकुनगुन्या व झिका यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

दर आठवड्याला एक दिवस कोरडा दिवस पाळा...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.22(डि-24 न्यूज) शहरात डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका इ. किटकजन्य आजार व गॅस्ट्रो, काविळ, कॉलरा, अतिसार या सारख्या जलजन्य आजाराचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे व साथरोग तज्ञ डॉ सय्यद सुमेय्या नाज यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

यात नागरिकांनी खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून महापालिकेस सहकार्य करावे. डेंग्यू, चिकुनगुन्या व झिका हे विषाणूजन्य (व्हायरल ) आजार आहे. हे आजार विशिष्ट प्रकारचा म्हणजे "एडिस इजिप्टाय" हा डास चावल्याने होतात. “ एडिस इजिप्टाय " हा डास साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. डेंग्यू, चिकुनगुन्या व झिका यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

" एडिस इजिप्टाय " या डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावी जसे कुलर्समध्ये पाणी, मनीप्लँटमधील पाणी, छतावर पडलेले निकामी भांडी, बाटल्या, नाराळाच्या करवंटया, टायर्स, झाकण नसलेल्या टाक्या, हौद इ.

दर आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. हौद, टाक्यांना नेहमी झाकण लावावे.

• घरातील कुलर्समध्ये पाणी, फुलदाण्यातील, मनीप्लॅटमधील पाणी आठवडयातून कमीत कमी एकदा बदलावे.

• घरातील सांडपाण्यात अबेट (टेमीफॉस) हे डास अळी प्रतिबंधात्मक औषध टाकून घ्यावे. घरात/ परिसरात

पाणी साचू देवू नये. साचलेल्या पाण्यात रॉकेल/ वाहनातील इंजिनचे जळालेले ऑईल टाकावे.

• हौदामध्ये गप्पीमासे सोडावी.

• डास प्रतिबंधात्मक मलम, उदबत्त्या, वडया यांचा वापर करावा. अंगभर कपडे घालावे व मच्छरदाणीचा वापर • महानगरपालिका तर्फे धूर फवारणी, औषध फवारणी, अबेट टाकणा-या कर्मचा-यांना सहकार्य करावे.

करावा.

• डेंग्यू, चिकुनगुन्या हा आजार नोटीफायबल आजार असल्यामुळे रुग्ण आढळल्यास खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी 24 तासाच्या आत मनपा आरोग्य विभागास कळविणे नर्सिंगहोम रजिस्ट्रेशन कायदयानुसार बंधनकारक आहे. डेंग्यू, चिकुनगुन्या या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत महानगरपालिकेच्या नजिकच्या आरोग्य केंद्रावर/ रुग्णालयात संपर्क साधावा.

जलजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना

• नेहमी शुध्द केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. ( उकळलेले किंवा क्लोरिनयुक्त)

• अन्नपदार्थ नेहमी शिजवून व ताजे खावे, शिळे अन्न खाण्याचे टाळावे, अन्नपदार्थ नेहमी झाकलेले असावे.

• उघडयावरील कापून ठेवलेली फळे, अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, जास्त पिकेलेली, कुजलेली, सडलेली फळे खाण्याचे टाळावे. • अन्न शिजवण्यापूर्वी, जेवणापूर्वी तसेच शौचास जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत, उघडयावर शौचास बसू नये, सर्वांनी वैयक्तिक स्वच्छता तसेच घर व परिसर स्वच्छता ठेवावी

• सर्व रुग्णांनी जवळच्या मनपाच्या आरोग्य केंद्र/रुग्णालय येथे संपर्क साधून उपचार घ्यावे.

• 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष टोल फ्रि क्र. 8956306007 वर कळवावे.

असे मनपा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

खाजगी व शासकीय रुग्णालयात वाढत आहे गर्दी....

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow