महापालिकेचा पुढाकार, दुर्बिणीद्वारे मोफत स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर
“महिलांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेचा पुढाकार - दुर्बिणीद्वारे मोफत स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर”
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेच्या सिल्कमिल कॉलनी रुग्णालय येथे आयोजित लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराची वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी स्वतः दि : 27/10/2025 रोजी पूर्वतयारीची पाहणी करून शिबिरा मध्ये सहभाग नोंदवलेल्या सर्व महिलांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी केली
तसेच काल दि : 28/10/2025 रोजी आयोजित लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरात ज्या 15 महिलांवर शस्त्रक्रिया केली त्या सर्व रुग्णांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी स्वतः शस्त्रक्रिया पश्चात पाहणी केली.
त्यानंतर आज दि :-29/10/2025 रोजी सकाळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची प्रकृती तपासणी केली व पुढील उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांना डिस्चार्ज कार्ड आणि गुलाबाचे फुल देऊन महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकेतून सुरक्षितपणे त्यांच्या घरी सोडण्यात आले.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांच्या 3 दिवसांच्या अथक प्रयत्नातून शिबिर यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले व सर्वांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीपणे पार पडले.
यावेळी रुग्णांनी मनपाच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून सकारात्मक प्रतिसाद देत वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे आभार व्यक्त केले .
या शिबिराच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकाभिमुख आणि स्त्री आरोग्य केंद्रित सेवा अधिक प्रभावीपणे देण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला आहे.
या पुढेही असेच लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर महानगरपालिकेच्या कैसर कॉलनी, नेहरूनगर, N-8 रुग्णालय आणि सिल्कमिल रुग्णालय येथे नियमितपणे घेण्यात येतील.
यावेळी कार्यक्रमास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ.अंजली पाथ्रिकर, डॉ. मनीषा भोंडवे, डॉ.बाळकृष्ण राठोडकर, डॉ. डिंपल परदेशी, डॉ. गोविंद नरवणे, डॉ. पंडित शिरसाठ, डॉ. सौरभ सरनाईक, असिस्टंट मेट्रन मीनल ठोकळ ,सी पी ओ अल्ताफ शेख, इंचार्ज सिस्टर बेबीनंदा झांबरे,(सिस्टर इन्चार्ज ) वर्षा सोनवणे, रोहिणी तुंबरे, विजयमाला कराडकर, संध्या तोर्डे, प्राजक्ता लांजेवार, सविता चारु (एएनएम) मन्सूर खान, समीर शेख,(deo)जयश्री पोटे,(PO) जय सोनवणे, शोभा बन्सोडे, आनंद कांबळे,कविता शिंदे,आरती मस्के (सेवक /सेविका ) आणि सिल्क मिल कॉलनी रुग्णालय येथील आशा ताई व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
What's Your Reaction?