मानसिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक आरोग्य सप्ताहाचा समारोप...!
मानसिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक आरोग्य सप्ताहाचा समारोप...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)- 10 ऑक्टोबर हा दिन जगभर मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने डॉ.ए.ए.कादरी मानसिक आरोग्य केंद्रातर्फे हा दिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. समाजामध्ये जागरुकता निर्माण व्हावी व मनोविकारांसोबत लढणा-या रुग्णांना समाजामध्ये जगता यावे या या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मानसिक आरोग्य केंद्रामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करुन हा दिन साजरा करण्यात आला. दिनांक 22 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे वादविवाद स्पर्धा, पोस्टर बनविण्याची स्पर्धा, नाट्य, लघु नाट्य, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण हाॅटेल रामा इंटरनॅशनल येथे जगप्रसिद्ध मनवाचक सुहानी शाह यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ.अजिज अहमद कादरी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. त्यानंतर पारितोषिक वितरणाचा समारंभ ठेवण्यात आला होता. शालेय स्तरावर पोस्टर बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मदिहा फातेमा शेख अकबर, द्वीतीय आयत शेख, तृतीय ओवी कुलकर्णी तर महाविद्यालयीन स्तरावर प्रथम अमनतुल्लाह जुबेर खान, सतीश गायकवाड यांना विभागून देण्यात आली. द्वीतीय मंदा अंबादास, तृतीय सहेज कौर यांना देण्यात आले. जिया टंडन व सिद्दीकी अमान यांना उत्कृष्ट वक्ता तर ओमिषा प्रिया व व्यंकटेश प्रमोद गायकवाड उत्कृष्ट टिमचे पारितोषिक देण्यात आले. नाट्य, लघु नाट्य स्पर्धेमध्ये शालेय स्तरावर प्रथम पारितोषिक सरोश उर्दू हायस्कूल, द्वितीय ब्लूमिंग बड्स इंग्लिश हायस्कूल तर तृतीय रुट्स अँड विंग्स इंग्लिश हायस्कूल यांना देण्यात आले. महाविद्यालय स्तरावर प्रथम पारितोषिक सरोश ज्युनिअर कॉलेज, द्वीतीय एससीटोज फाॅर्मसी, तृतीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्य शास्त्र विभाग व सि.एस.एम.एस.डेंटल काॅलेज यांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धेमध्ये शालेय स्तरावर प्रथम पारितोषिक सिरत हैदर, द्वितीय अफिफा कुलसुम व तृतीय करुणा केदारे यांना देण्यात आले. तर महाविद्यालयीन स्तरावर प्रथम आयशा राहीन, द्वितीय हुरीया जरीन, तृतीय शेख मोहम्मद झैदी यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.अजिज अहमद कादरी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.अजिज अहमद कादरी व डॉ.मेराज कादरी, श्रीमती अंजुम कादरी यांनी केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनपा प्रशासक जी.श्रीकांत, ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे पोलिस अधिक्षक डॉ.विनयकुमार राठोड, जीएसटी उपायुक्त नासेर मनेर, कर्नल प्रशांत गौर, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके, डॉ.विनय चपळगावकर, डॉ.जितेंद्र डोंगरे, मनोविकार तज्ज्ञ जिल्हा रुग्णालय, एड नासेर बिस्मिल्लाह शाह, अमित राऊत कमीटी मेंबर(एमएचआरबी) यांची उपस्थिती होती. जागतिक मानसिक आरोग्य दिनाची सांगता जगप्रसिद्ध मनवाचक सुहानी शाह यांच्या कार्यक्रमाने झाली. या शोमध्ये सुहानी शाह यांनी प्रेक्षकांना छोटे छोटे शब्द विचारुन प्रेक्षकांचे मानवाचं करुन सर्वांना आचंभित केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. सय्यद जफर, मोहम्मद नजीर, चेतन चव्हाण, टीम बियाँडचे अनस देशमुख, अकिब खान, शाहीद कास्मी यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?