आयुष्यमान व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे - डॉ. ओमप्रकाश शेटे
आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे-डॉ. ओमप्रकाश शेटे
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) जिल्ह्यातील आयुष्मान कार्डची ई केवायसीची प्रक्रिया ही सेतू सुविधा केंद्राच्या मार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते. या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणानी सहभाग घ्यावा, असे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, ई केवायसी नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा,आयुष्यामान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.रवी भोपळे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रामध्ये दि.14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबवून नागरिकांची नोंदणी व ई केवायसी करण्यात येणार आहे. यासाठी सेतू सुविधा केंद्र व महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ .पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देशही डॉ. शेटे यावेळी दिले . जिल्ह्यामध्ये सेतू सुविधा अंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी नागरिकांनी करावी व आयुष्मान भारत कार्ड लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असे डॉ. शेटे यांनी सांगितले. आशासेविकाच्या संप कालावधीमुळे य नोंदणी तसेच तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.
नोंदणी कार्यात कुचराई करणाऱ्या सुविधा केंद्रवर कारवाई- सरकारच्या सुविधा केंद्राच्या प्रतिसादाबद्दल समितीचे अध्यक्ष शेटे यांनी नाराजी व्यक्त करून संबंधित सक्रिय नसलेल्या सेतू सुविधा केंद्रांना नोटीस देऊन कायमचं यादीवरून वरून काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात यावेत, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला शेटे यांनी केली. बंद असलेल्या सेतू सुविधा केंद्राची यादीतून कायमचे वगळण्याचे सांगण्यात आले. महानगर पालिकेच्या प्रत्येक वार्ड निहाय क्षेत्रामध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र काम करणार असून जिल्ह्यातील 30 टक्के असलेले प्रमाण 50% च्या वर नेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
What's Your Reaction?