नवीन वर्षात मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प घ्या, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया यांचे आवाहन

मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला तर अंधत्व निवारण होईल - नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया
डॉ.कांकरिया यांच्या शिबिरात उपचार केल्यास डोळ्यांचा चष्मा नेहमीसाठी काढून जाईल...?
औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) नवीन वर्षात मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करावा. देशातील अंदाजे 20 लाख लोक अंधत्वाचा सामना करत आहे त्यांच्या जीवनात दृष्टी देऊन नेत्रदान करण्याची चळवळ मजबूत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पत्रकार परिषदेत प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया यांनी केले आहे.
स्वतःच्या आई व वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करुन दोन गरजू नेत्रदात्यांवर नेत्ररोपण करणारे हे पहिले नेत्रतज्ज्ञ डॉक्टर कांकरिया आहे. यावेळी डॉ.सौ.सुधा कांकरिया यांचीही उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्र उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगरच्या साई सुर्य नेत्रसेवा लेसर प्रणालीद्वारे आधारित सर्वात आधुनिक "काँट्युरा व्हिजन" तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून या तंत्रज्ञानामुळे केवळ चष्म्याचा नंबर कायमचा जात नाही तर चष्म्यापेक्षाही चांगली दृष्टी देणे आता शक्य झाले आहे. डॉ.प्रकाश कांकरिया यांचे चष्मा नको असणाऱ्यांसाठी महाराष्ट्रात भव्य नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिर नेहमीच आयोजित केली जातात.
या तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतीच्या दृष्टी समस्येवर व चष्म्याचा नंबर आता पूर्णपणे घालवता येत असून चाळीशी नंतरही आता चष्म्याचा नंबर घालवता येणार आहे व काही लहान मुलांच्या दृष्टी समस्येवरही आता उपचार शक्य होणार आहे.
त्याचप्रमाणे केरेटोकोनस या आजारावर आता यशस्वी उपचार करता येणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे अतिशय लहानपणी दृष्टीदोष व मोठ्या चष्म्याचे नंबर लागण्याचे प्रमाण मोठ्या गतीने वाढत असून हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. पूर्वी संपूर्ण शाळेत 4-5 जणांवर चष्मा असायचा त्यांना कंदील म्हणून चिडवायचे आता प्रत्येक वर्गात 10-15 कंदील झाले आहे असे डॉक्टर कांकरिया यांनी सांगितले.
यापुढील आयुष्यात सैन्यात जाणे, पोलिस भरती, पायलट होणे, नेव्ही, एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा, रेल्वे व अनेक जाॅबसाठी नकार दिला जातो. त्याचप्रमाणे अभिनय करणे, माॅडेलिंग, चित्रपट व मालिका विविध प्रकारचे खेळ खेळणे यासाठी अडचणी येतात. 3-4 नंबर पेक्षा जास्त नंबर असलेल्या व्यक्तींना चष्म्याविना अपंगत्व आल्याप्रमाणे वाटते.
आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात डॉ.प्रकाश कांकरिया चष्मा नको असणाऱ्या रुग्णांच्या तपासणी करून त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन करतात.
जगात सर्वप्रथम एक दिवसात शंभर पेक्षा अधिक लॅसिक नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा बहुमान नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. अंधत्व असलेल्या नेत्ररुग्णांसाठी भारतातील पहिली मान कन्हैया या नावाची नेत्रपिढी अहमदनगर मध्ये सुरू केली.
नेत्रपिढीच्या स्थापनेनंतर डॉ.कांकरिया यांनी स्वतःच्या आई वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करुन अंधत्व असलेल्या गरजू नेत्ररुग्णांवर त्यांचे नेत्ररोपण केले. तिरळेपणा असल्यामुळे विवाहासाठी नकार मिळणाऱ्या अनेक नववधूवर तिरळेपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया केली व त्यांच्या जीवनाला नवीन दिशा दिली.
What's Your Reaction?






