कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण...! आरोग्याची काळजी घ्या,, केले आवाहन

 0
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण...! आरोग्याची काळजी घ्या,, केले आवाहन

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण... आरोग्याची काळजी घ्या, केले आवाहन...!

मुंबई, दि. 24(डि-24 न्यूज) राज्यात आणि देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असून अनेक ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

 अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

 मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर हँडलवर लिहिले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली असता चाचणी पॉझिटिव्ह आली.

 तेव्हापासून मुंडे हे त्यांच्या पुण्यातील घरी आयसोलेशनमध्ये आहेत, तिथे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .काळजी करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 मी लवकरच बरा होऊन तुम्हा सर्वांच्या सेवेत रुजू होईल असेही त्यांनी सांगितले.

 सध्या थंडीचे वातावरण असून कोविडची नवीन व्हेरिएंट जेएन-वन दाखल झाली आहे. त्यामुळे घाबरून न जाता प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे ट्विट त्यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow