मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या फे-या रद्द...

 0
मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या फे-या रद्द...

मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या फे-या रद्द...

नांदेड, दि.27(डि-24 न्यूज) - हैदराबाद विभाग मधील भिकनूर - तळमडला सेक्शन तसेच अक्कनपेट-मेडक सेक्शन या रेल्वे मार्गावर मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर सातत्याने पाणी साचत असल्याने आज 27 ऑगस्ट व उद्या 28 ऑगस्ट रोजी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती साऊथ सेंट्रल रेल्वे नांदेड विभागाने दिली आहे.

आज 27 ऑगस्ट गाडी नं. 17684 पुर्णा-अकोला गाडी रद्द, गाडी नं.17406 आदीलाबाद-तिरुपती गाडी रद्द, उद्या 28 ऑगस्ट गाडी नं.77607अकोला-आकोट, 77608आकोट-अकोला, 77609 अकोट अकोला, 77610 अकोला अकोट, 77621 अकोट-अकोला, 77612 आकोट-अकोला या गाड्या रद्द करण्यात आले असल्याची रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी.

या मार्गात बदल करण्यात आला आहे....

दिनांक 27 ऑगस्ट रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रं.17764 नांदेड- रायचूर-एक्सप्रेस मार्ग बदलून पूर्णा, परळी, विकाराबाद अशी धावेल, रायपूर येथून सुटणारी गाडी क्रं.17764 रायपूर-नांदेड एक्स्प्रेस मार्ग बदलून विकाराबाद-परळी, पुर्णा अशी धावेल. दि.27 ऑगस्ट रोजी मनमाड येथून सुटणारी गाडी क्रं.17063 मनमाड-काचीगुडा एक्सप्रेस मार्ग बदलून परभणी, परळी, विकाराबाद, सिकंदराबाद अशी धावेल. दि.26 ऑगस्ट रोजी हिसार येथून सुटणारी गाडी क्रं.17019 हिसार-हैदराबाद- एक्स्प्रेस मार्ग बदलून पूर्णा-परभणी-पथळी-विकाराबाद अशी धावेल. दि.27 ऑगस्ट रोजी काचीगुडा येथून सुटणारी गाडी क्रं.17064 काचिगुडा-मनमाड एक्स्प्रेस मार्ग बदलून सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी अशी धावेल. दि.27 ऑगस्ट रोजी नसरापूर येथून सुटणारी गाडी क्रं.12787 नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस मार्ग बदलून वरंगल-खाईट-पेद्दुपल्ली-काराम्रगर-निझामाबाद अशी धावेल. दि.27 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथून सुटणारी गाडी क्रं.12720 हैदराबाद जयपूर एक्स्प्रेस मार्ग बदलून सिकंदराबाद, काझीपेत, पेद्दपल्ली, करीमनगर, अर्नुर, निझामाबाद अशी धावेल. दि.27 ऑगस्ट रोजी लीगमपल्ली येथून सुटणारी गाडी क्रं. 17058 लीग्मपल्ली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई देवगिरी एक्स्प्रेस मार्ग बदलून सिकंदराबाद, काझीपेत, पेद्दपल्ली, करीमनगर, अर्मुर, निझामाबाद अशी धावेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow