उत्तराखंड येथील ढगफुटीच्या घटनेच्या पार्श्वभुमिवर नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा...

 0
उत्तराखंड येथील ढगफुटीच्या घटनेच्या पार्श्वभुमिवर नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा...

उत्तराखंड येथील ढगफुटीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर

नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज) -उत्तराखंडमध्ये गंगोत्रीच्या मार्गावर ढगफुटीमुळे पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी कळविल्यानुसार सद्यस्थितीत या ठिकाणी परिस्थिती सामान्य असून दुपारनंतर रस्ते खुले होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

उत्तराखंड येथे अडकलेल्या भाविकांच्या नातेवाईकांनी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून अडकलेले किंवा संपर्क न झालेल्या भाविकांची माहिती जिल्हा प्रशासनास कळवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी केले आहे.

माहितीसाठी संपर्क क्रमांकः- राज्य नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र राज्य संपर्क क्र. 9321587143 जिल्हा नियंत्रणक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर संपर्क क्र. 0240-2331077 जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती मस्के संपर्क क्र.7350335104.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow