मध्य मधून बाळासाहेब थोरात असतील उमेदवार, तनवानींना केले पदमुक्त - अंबादास दानवे
 
                                मध्य मधून बाळासाहेब थोरात असतील उमेदवार, तनवानींना केले पदमुक्त - अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) औरंगाबाद मध्य मधून किशनचंद तनवानी यांनी माघार घेतल्यानंतर आता उबाठा गटाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात हे अधिकृत उमेदवार असणार आहे असा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे तर जिल्हाप्रमुख पदावरुन तनवानी यांना पदमुक्त करण्याचे आदेश ठाकरेंनी दिले आहे. पूर्ण ताकदीनिशी उबाठा या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. उद्या बाळासाहेब थोरात हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उबाठाचे नेते तथा विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
तनवानी यांच्या पाठीमागे संघटनेने पूर्ण ताकत उभी केली होती सकाळी त्यांच्याशी बोलने झाले. त्यांच्या सचिवाने अर्ज घेऊन गेले परंतु अचानक त्यांनी हा निर्णय माध्यमांसमोर घेतला हा संघटनेला धोका नाही का. आता त्यांच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी विभागून महानगरप्रमुख राजू वैद्य व त्र्यंबक तुपे यांच्याकडे दिली आहे. मुस्लिम मते एमआयएम कडे वळतील हा भ्रम आहे. महाविकास आघाडीत एकजूट आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व उबाठाला मुस्लिम मते मिळाली होती ती एमआयएमकडे न वळता उबाठाच्या उमेदवाराला मिळतील पूर्ण ताकदीनिशी आम्ही प्रचारात उतरुन जनतेपर्यंत पोहोचणार व विजय मिळवणार असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            