एसडिपिआईने बीडकीनची कार्यकारीणी केली गठीत

एसडिपिआईने बीडकीनची कार्यकारीणी केली गठीत
पैठण, दि.3(डि-24 न्यूज)
तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात व बाजारपेठेचे नावाजलेले गांव बिडकीन ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकांच्या विविध प्रश्न सरकार दरबारी उपस्थित करण्यासाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या(एसडिपिआय) ची कार्यकारीणी प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष साकी अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली तालूक्याचे नेते हाफिज इम्रान यांनी गठीत केली आहे.
या कार्यकारीणित बिडकीनचे अध्यक्ष म्हणून सय्यद अलताफ, उपाध्यक्ष हाफिज अब्दुल कदीर, जनरल सेक्रेटरी शेख साजिद, सेक्रेटरी अकील गुलाब शेख व इतर सदस्यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?






