रमेश गायकवाड यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचा जाहीर पाठिंबा, अल्पसंख्याक समाजाची मिळत आहे साथ

 0
रमेश गायकवाड यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचा जाहीर पाठिंबा, अल्पसंख्याक समाजाची मिळत आहे साथ

रमेश गायकवाड यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचा जाहीर पाठिंबा, अल्पसंख्याक समाजाची मिळत आहे साथ

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.7(डि-24 न्यूज) औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील रिपाइं(डेमोक्रॅटिक) पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश लक्ष्मणराव गायकवाड यांना आज रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख राजुभाई साबळे यांनी केली आहे.

त्यांनी पुढे सांगितले रमेश गायकवाड यांना अल्पसंख्याक समाजाचीही साथ मिळत असल्याने त्याचा या मतदारसंघातून विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

तन मन धनाने पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात उतरलो आहे.

गेल्या 4 दशकांहुन अधिक काळ रमेश गायकवाड यांचे फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्य असल्याने विद्यार्थी दशेपासून तर नामांतर चळवळ, गायरान जमिनी प्रश्नी आंदोलन व त्याचप्रमाणे मराठवाड्यासाठी महत्वाच्या पाणी प्रश्नांबाबत व्यापक जनआंदोलन, झोपडपट्टी वासीयांच्या मुलभूत सोयी सुविधा, आरक्षण बचाव आंदोलन, खाजगीकरण विरोधी आंदोलन, बहुजन व अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी जन आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराज-महात्मा ज्योतीबा फुले-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोचवण्याचे कार्य तसेच संविधान बचाव परिषद, रिपब्लिकन ऐक्यासाठी पुढाकार अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्व व चळवळीतील धर्मनिरपेक्ष विकास पुरुष, सातत्याने रिपब्लिकन चळवळीमध्ये सक्रीय कार्य करणारे उमेदवार रमेश गायकवाड यांचे बहुमुल्य कार्य विचारात घेऊन आज त्यांना ख-या अर्थाने पश्चिम विधानसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांना त्यांनी आवाहन केले गायकवाड यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे.

यावेळी रमेश गायकवाड, पक्षप्रमुख राजुभाई साबळे, अॅड अविनाश थिट्टे, सुरेश शिनगारे, सुनील कोतकर, अनिल ढाले, जिल्हाध्यक्ष अय्यूब पटेल, साहेबराव जाधव, रंजित मनोरे, सुनील खरात, शेख कदीर, स्वप्निल खंडागळे, जयनाथ बोर्डे, संतोष जाधव, अरशद लखपती, अॅड विकास बनकर, अॅड के.बी.पवार, अॅड युवराज जाधव, अॅड विकास सोनवणे, विशाल गाडे, मधुकर कांबळे, सिध्दार्थ गायकवाड, प्रशांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow