अन्यायाच्या विरोधात कुरेशी समाज रस्त्यावर, मुक मोर्चाला मिळाला प्रतिसाद...

 0
अन्यायाच्या विरोधात कुरेशी समाज रस्त्यावर, मुक मोर्चाला मिळाला प्रतिसाद...

अन्यायाच्या विरोधात कुरेशी समाज रस्त्यावर, मुक मोर्चाला मिळाला प्रतिसाद...

रस्त्यावर गोथक्षकाच्या नावाखाली गुंडागर्दी थांबवा, समाज कंटकापासून संरक्षणाची कुरेशी समाजाची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज) - गोथक्षकांच्या नावाखाली गुंड लोक जातीच्या नावाखाली बंदी नसलेल्या जनावरांची वाहतूक करताना मारहाण करणे, प्राणघातक हल्ला करणे, खंडणी वसूल करणे, शिविगाळ करणे असले प्रकार वाढले आहे. यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला. यांच्यावर सरकारने प्रतिबंध घालावा. कुरेशी समाजाचा वर्षानुवर्षे चालणा-या व्यापारावर अडवणूक केली जात आहे. या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्रातील व्यापा-यांनी दिड महीन्यात पासून खरेदी विक्री बंद करुन बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे लाखो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन शेतकरी सुध्दा आर्थिक अडचणित सापडले आहे. या अन्यायाच्या विरोधात कुरेशी समाजाने आज रस्त्यावर उतरुन भव्य मुक मोर्चा काढला. दुपारी दोन वाजता ऐतेहासिक आमखास मैदानावरुन हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

या मोर्चा मोठ्या संख्येने कुरेशी व मुस्लिम समाजाचे व्यापारी, शेतकरी, दलित व विविध पक्ष संघटनाचे नेते उपस्थित होते. मोर्चा जमीयतुल कुरेशचे जिल्हाध्यक्ष हाजी इसा कुरेशी, कलिम कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.

विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात गोरक्षकांच्या नावाखाली समाजकंटकाकडून होणारे बेकायदेशीर कृत्य थांबवावे. शेतकरी व व्यापा-यांना असे समाजकंटकांकडून संरक्षण देण्यात यावे. गोरक्षक कायदा नावाखाली खोटे फौजदारी खटले, तडीपार, एमपीडीए, मोका सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे परत घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात व तालूक्यात स्लाॅडर हाऊसची निर्मिती करण्यात यावी. खरेदी विक्री करण्यात आलेले जनावरे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून हिसकावून घेण्यात येते. ते जनावरे गो-शाळेच्या नावाखाली त्यांनी तस्करी त्यांच्याकडून हीत असल्याने ती तात्काळ थांबवण्यात यावी.  

मुक मोर्चात जमीयतूल कुरैश महाराष्ट्र, जिल्हाध्यक्ष हाजी इसा कुरेशी, कलिम कुरेशी, हाजी सलिम कुरेशी, कदीर मौलाना, कमाल फारुकी, अरविंद कांबळे, जयश्री शिर्के, अफसरखान, नासेर सिद्दीकी, इलियास किरमानी, एड सय्यद अक्रम, एड गायकवाड, सय्यद कलीम, एम.डि.तय्यब, एड अनिस शेख, हाफीज मुख्तार कुरेशी, मोहसीन खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow