अलिम बेग ग्लोबल महाराष्ट्र समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

 0
अलिम बेग ग्लोबल महाराष्ट्र समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

अलीम बेग ग्लोबल महाराष्ट्र समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

छ.संभाजिनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) येथील समाजसेवक अलीम बेग यांना उज्वल महाराष्ट्रातर्फे ग्लोबल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक येरमे निवृत्त न्यायाधीश दर्शन सिंग बेदी, गब्बर ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी, सेंट्रल हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख, हफीज अली, सलीम चिस्ती, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे नबी पटेल यांच्या हस्ते समाजसेवक अलीम बेग यांना मौलाना आझाद सेंटर येथे कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

अलिम बेग मागिल 20 वर्षापासून शहरात समाजसेवा करत असून गोरगरीब लोकांना वेळोवेळी मदत करून सहकार्य करत आहेत तसेच घाटी रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करून त्यांना औषध पुरवठा करून देणे, तसेच काही लोक खोटी तक्रार देऊन लोकांना पोलीस स्टेशनमध्ये नाहक त्रास देत असतील तर त्यांची मदत करत असतात. तसेच गोरगरीब मुलींच्या लग्नासाठी किंवा शैक्षणिक मदतीसाठी सतत धावत असतात. या कार्याची दखल घेत साप्ताहिक उज्वल महाराष्ट्र तर्फे गोलोबल समाज रत्न पुरस्काराने अलीम बेग यांना सन्मानित करण्यात आले. आहेत यावेळी अलीम बेग यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow