नवीन गणेश महासंघाने केला " सन्मान स्त्री शक्तीचा, सिने अभिनेत्री डाॅ.निशिगंधा वाड यांच्या शुभहस्ते

नविन गणेश महासंघाने केला “सन्मान स्त्री शक्तीचा”
- सिनेअभिनेत्री डाॅ. निशिगंधा वाड यांच्या शुभहस्ते झाला सन्मान
- डाॅ.जितेंद्र देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली
छ.संभाजिनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) नविन छत्रपती संभाजीनगर श्री. गणेश महासंघाच्या वतीने यावर्षी विविध सामाजिक तथा सांस्कृतीक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, जनजगृती रॅली, शांतता रॅली, कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आज रोजी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य, पत्रकार, डाॅक्टर, शिक्षिका, पोलीस, महावितरण, वकील, उद्योजिका, बचत गट, आरोग्य सेविका या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्री शक्तींचा सन्मान सिनेअभिनेत्री डाॅ.निशिगंधा वाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे होते. सदरील कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, सौ.अनश्वा देहाडे, कार्याध्यक्ष प्रमोद ठेंगडे पाटील, स्वागताध्यक्ष सागर नागरे, सचिव साहेबराव निकम, मोहित जाधव, नरेश पाखरे, अजय डिडोरे, विशाल डिडोरे उपस्थित
होते.
What's Your Reaction?






