मार्टी स्वायत्त संस्था जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत संघर्ष, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची मागणी

 0
मार्टी स्वायत्त संस्था जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत संघर्ष, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची मागणी

मार्टी स्वायत्त संस्था जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत संघर्ष

औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) ज्या पध्दतीने शासनाने विविध समाजघटकांच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योतीची स्थापना केली त्या पध्दतीने स्वायत्त संस्था मार्टी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने सुरू करण्यासाठी औरंगाबाद येथे होणा-या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात यावे या मागणीचे निवेदन आज विभागीय आयुक्त मौलाना आझाद रिसर्च एण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) तर्फे देण्यात आले.

मार्टीचा अभ्यास करुन सविस्तर अहवाल वेळोवेळी सरकारला पाठवला आहे. मागील काही वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे जोपर्यंत हा निर्णय घेण्यात येणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहणार आहे अशी माहिती डि-24 न्यूजला मार्टीचे अध्यक्ष अजहर पठाण यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्याक मंत्री व विविध राजकीय पक्ष यांना वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा सुरू आहे.

याप्रसंगी अभ्यास कमेटी सदस्य सत्तार खान, आसिफ सर, जाहेद अलकसेरी, असरार पटेल, आसेफ अबरार खान, अशफाक अहेमद, अनिस रामपुरे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow