सेवानिवृत्त भारतीय सेना अधिकारी फतेह मोहंमद यांचे निधन, सेनेने दिली सलामी

 0
सेवानिवृत्त भारतीय सेना अधिकारी फतेह मोहंमद यांचे निधन, सेनेने दिली सलामी

सेवानिवृत्त भारतीय सेना अधिकारी फतेह मोहंमद यांचे निधन, सेनेने दिली सलामी

औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) भारतीय सेनेतील सेवानिवृत्त अधिकारी शाहबाजार येथील रहिवासी फतेह मोहंमद खान, वय 96 यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय सिमेवर त्यानी जम्मू काश्मीर, बेंगळुरू व विविध शहरांमध्ये सेवा बजावत देशाची सेवा केली. त्यांची थेट राष्ट्रपती यांनी सेनेच्या अधिकारी पदावर नियुक्ती केली होती. भारत-चीन, भारत-पाकीस्तान, भारत-बांगलादेश युध्दात त्यांनी अनमोल कामगिरी बजावली होती अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी डि-24 न्यूजला दिली आहे. आज सायंकाळी पाच वाजता औरंगाबाद ब्रिगेडचे अधिकारी यांनी सलामी(guard of owner) देत अखेरचा निरोप दिला. सेनेच्या अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली दिली. त्यांची नमाजे जनाजा शाहबाजार काली मस्जिद येथे संपन्न झाली तर दफनविधी पिरगैब साहाब कब्रस्तानात करण्यात आला. माजिद खान, कदीर खान यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पाच मुले व नाती पोती असा मोठा परिवार आहे. दफनविधीसाठी मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow