मराठा आरक्षण... सुप्रीम कोर्टातील कायदेशीर व घटनात्मक स्थितीवर वकीलांची परिषद
मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टातील कायदेशीर व घटनात्मक स्थिती वकिलांची...
मंथन परिषद...
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) दिनांक 10 सप्टेंबर 2023 दुपारी 3 वाजता परिषद होणार आहे या परिषदे मध्ये मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टातील कायदेशीर व घटनात्मक स्थिती या नियोजीत विषयावर न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ, अभ्यासक यांचे उपस्थितीत मराठा आरक्षण वकीलांची मंथन परिषद रविवारी आईन्स्टाईन सभागृह,
महात्मा गांधी मिशन ( एम जी एम) परिसर एन-6 सिडको येथे आयोजन केले आहे.
या महत्वपुर्ण परिषदेसाठी जिल्हा आणि उच्च न्यायालयाचे वकील बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन अमुल्य सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले असुन या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी विधीज्ञ नरसिंहजी जाधव अध्यक्ष उच्च न्यायालय वकील संघ, विधीज्ञ सदानंद सोनुने सचिव जिल्हा वकील संघ, विधीज्ञ सुनील जाधव मा. अध्यक्ष जिल्हा वकील संघ विधीज्ञ किरण जाधव उच्च न्यायालय विधीज्ञ राधाकृष्ण इंगोले उच्च न्यायालय, विधिज्ञ रविंद्र गोरे उच्च न्यायालय
या सह आरक्षणाचे अभ्यासक व्याख्याते म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत प्रामुख्याने परिच्छेद 340 चे कार्यक्षेत्र, न्यायमुर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल व मीमांसा, उच्च न्यायालय मुंबईचा निकाल व त्याची मीमांसा, इंद्रा सहानी निकालाची मीमांसा, सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणा बाबतचा अंतिम निकालाची मीमांसा आणि आता पुढे काय ? कायदेशीर व घटनात्मक आरक्षण कसे मिळेल या वर अभ्यासकाचे कायदेशीर व घटनात्मक आरक्षण व त्यावरील उपाय या वर सविस्तर मार्गदर्शन होणार असुन सदर कार्यक्रमाचे स्थळ आईन्स्टाईन सभागृह एमजीएम परिसर
एन-6 येथे दिनांक 10 सप्टेंबर 2023 दुपारी 3 वाजता होणार असुन फक्त वकील बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील आणि मराठा क्रांती युवा मोर्चाचे विकिराजे पाटील, विधिज्ञा सुवर्णा मोहिते यांनी केले आहे.
What's Your Reaction?