मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम असे आहेत

 0
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम असे आहेत

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम...

औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले आहे. कार्यक्रमाची रुपरेषा अशी आहे , 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8.45 ते 9.30 वाजता शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी व राष्ट्रगीत राज्य गीत गायन क्रांतीचौक ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, औरंगाबाद. दुपारी 12 ते 4 मुक्तीसंग्रामाच्या अनुषंगाने विशेष व्याख्यान वंदे मातरम् सभागृहात होईल. सायंकाळी 7 ते 9.30 सांस्कृतिक मंडळ मैदानावर माझा मराठवाडा लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते 9.30 युवक व नागरिकांच्या विविध वयोगटातील मिनी मैरेथाॅनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. हा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल येथे होईल. त्यानंतर विविध भूमिपूजन व उद्घाटन 9.30 ते 10.30 वाजता सातारा देवळाई परिसरातील मलनिःसारण योजनेचे ई-भूमुपूजन, हर्सूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई-लोकार्पन हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होईल. दुपारी 12 ते 3 स्मार्ट सिटी कार्यालय येथे मंत्रीमंडळ बैठक व पत्रकार परिषद. रात्री 12 वाजता क्रांतीचौकात लेझर शो, ड्रोन शो कार्यक्रम.

17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8.45 ते 9.30 वाजेपर्यंत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सिध्दार्थ गार्डन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम. यानंतर तेथेच मराठवाडा मुक्ती संग्राम शपथ व चित्ररथास झेंडा दाखवून चित्रफेरीस सुरुवात. मराठवाडा मुक्ती संग्राम चित्रप्रदर्शनास भेट. सायंकाळी 7 ते 9 माझा मराठवाडा सांस्कृतिक कार्यक्रम हा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow