रेल्वेस्टेशन रिक्षा स्टँड कायम राहणार, लाल बावटा रिक्षाचालक युनियनला मिळाले आश्वासन...

रेल्वे स्टेशनची रिक्षा स्टॅन्ड कायम राहणार !
लालबावटा रिक्षा चालक युनियनला स्टेशन मास्तरांचे आश्वासन !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.1(डि-24 न्यूज)- नवीन बांधकामामुळे रिक्षा स्टॅन्डला कोणताही अडथळा आणणार नाही असे आश्वासन औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर सुनील भिरारे यांनी लाल बावटा रिक्षा चालक युनियनला दिले.
याबाबत असे की, रेल्वे स्टेशनच्या इमारती पाडून नवीन बांधण्याचा घाट मोदी सरकारच्या आदेशाने संपूर्ण देशभर केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद अगदी 11 वर्षांपूर्वी बांधलेली चांगली इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी तयारी सुरू आहे. यासाठी प्रवाशांना बाहेर पडण्यासाठीचा मार्गही बदलण्यात आला आहे. मुख्य दरवाजातून आत येताना रिक्षा स्टॅन्डच्या दिशेला कुंपण लावण्याचे काम सुरू होते यामुळे रिक्षा स्टँडच्या जागेला घेरुन कुंपण लावले जाणार जाणार असेल तर पर्यायी रिक्षा स्टॅन्डची व्यवस्था आहे काय अशी विचारणा लालबावटा रिक्षा चालक युनियन तर्फे निवेदनाद्वारे स्टेशन मास्तर औरंगाबाद रेल्वे स्टेशन यांना करण्यात आली. यावर स्पष्टीकरण देताना स्टेशन मास्तर सुनील भिरारे यांनी रिक्षा स्टॅन्डला अडथळा आणणार नाही, असे आश्वासन दिले. लाल बावटा रिक्षा चालक युनियन तर्फे यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदना संदर्भात स्पष्टीकरण देताना ते बोलत होते. यावेळी लालबावटा रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष अँड . अभय टाकसाळ, वसीम खान सिकंदर खान, शेख अमजद शेख पाशु, शेख फिरोज, रफिक बक्ष, राजू हिवराळे,शहीद अमोदी, संजय सदावर्ते, रवींद्र जीनवाल, वाहतूक सेनेचे सलीम खामगावकर, मराठवाडा टॅक्सी युनियनचे वसीम सिद्दिकी यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते. जीआरपीएफ, आरपीएफचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते.
What's Your Reaction?






