भाजपाच्या 14 बंडखोरांवर कार्यवाई, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती...
14 बंडखोरांवर भाजपाची कार्यवाई, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिंदे सेना व भाजपा कडून काही इच्छूकांची संख्या जास्त होती तिकीट मिळाले नसल्याने काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काही उमेदवारांची समजूत काढून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही प्रमाणात नेत्यांना यश आले परंतु भाजपाचे 14 बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले नसल्याने भाजपाच्या उमेदवारांची डोकेदुखी या निवडणुकीत वाढणार आहे. भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी पक्षशिस्त मोडणा-या 22 कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे आता त्यांना पक्षात घेतले जाणार नाही. ते निवडून येणार नाही निवडून आले तरीही पक्षात त्यांना आता जागा राहणार नाही, पक्षशिस्त मोडने भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही असे शितोळे यांनी सांगितले आहे. आता बंडखोर उमेदवार काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?