सईदा काॅलनीत एमआयएमच्या प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन...
सईदा काॅलनीत एमआयएमच्या प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन...
प्रभाग क्रमांक 4 च्या विकासासाठी एमआयएमच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचे युनुस पटेल यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - हर्सुल येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने धुमधडाक्यात सईदा काॅलनी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करुन सुरुवात केली आहे. भंतेजी नागसेन, हाफीज शौकत पटेल यांनी फित कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून पक्षाची पतंग... पतंग...गाण्यावर थिरकत हातात हिरवे, निळे झेंडे घेत गळ्यात भगवे, हिरवे रुमाल घालून चारही उमेदवारांचे स्वागत केले. सईदा काॅलनीतील नागरीकांनी उमेदवार व मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी एमआयएमचे नेते युनुस पटेल यांनी मतदारांना आवाहन केले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एम
आयएमचे उमेदवार अशोक हिवराळे, विजयश्री जाधव, अजहर पठाण, झिनत युनुस पटेल यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले. यावेळी कामगार संघटनेचे नेते गौतम खरात यांनीही एमआयएमच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे कळकळीचे आवाहन केले.
व्यासपीठावर माजी नगरसेवक गौतम लांडगे, माजेद पठाण, कदीर देशमुख, शेख सलिम, शेख सोहेल, शहेबाज देशमुख व असंख्य कार्यकर्ते व परिसरातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?