इब्राहीम पटेल यांच्या प्रचारार्थ रैलीत जनसैलाब, प्रभाग क्रमांक 12 काँग्रेसमय...
इब्राहीम पटेल यांच्या प्रचार रैलीत जनसैलाब, प्रभाग 12 झाला काँग्रेसमय...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीत प्रचाराला सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग 12 मध्ये चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आझाद चौक येथून भव्य रैली काढून वातावरण काँग्रेसमय केले. फटाक्यांच्या आतिषबाजी करून हातात पंजा निशाणी व गळ्यात रुमाल आणि काँग्रेस पक्षाचे झेंडे घेत पक्षाचे सर्वसाधारण जागेतून अधिकृत उमेदवार इब्राहीम पटेल व पॅनलमधील तीन उमेदवारांसाठी मते मागितली. खुल्या जीपमध्ये इब्राहीम पटेल यांनी मतदारांचे स्वागत स्विकारत जनतेला अभिवादन केले. इब्राहीम पटेल यांचे या प्रभागात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांना बहुमताने निवडून देण्यासाठी मतदार उत्सुक असल्याचे चित्र आहे.
या रैलीत काँग्रेसचे प्रदेश सचिव सरताज पठाण, ताहेर पटेल, इस्माईल पटेल, शाकेर पटेल, सदफ पटेल, शेख नईम, शेख आसेफ, शेख आरेफ, श्रीराम इंगळे, रफीक पटेल, अब्बु पटेल, सरनवाज अन्सारी, शफी मौलाना, फेरोज खान, फय्यू शेख, निसार पटेल, शौकत पटेल, खालिक देशमुख, शेख हुजुर, शेख अस्लम, बिस्मिल्ला खान, जाकेर पटेल व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
.
What's Your Reaction?