इब्राहीम पटेल यांची लोकमत भवनला सदीच्छा भेट, राजेंद्र दर्डा यांनी दिल्या शुभेच्छा...
इब्राहीम पटेल यांची लोकमत भवनला भेट, राजेंद्र दर्डा यांनी दिल्या शुभेच्छा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 चे अधिकृत उमेदवार इब्राहीम पटेल यांनी आज लोकमत भवनला सदीच्छा भेट दिली. याप्रसंगी लोकमतचे मुख्य संपादक राजेंद्र बाबू दर्डा यांनी शाल व पुष्पहार घालून त्यांचे सत्कार केले. त्यांनी यावेळी महापालिका निवडणुकी विषयी चर्चा केली. प्रभाग क्रमांक 12 मध्ये इब्राहीम पटेल यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कटकट गेट, रहेमानिया काॅलनी, शरीफ काॅलनी व किराडपुरा येथील मतदारांनी इब्राहीम पटेल यांना बहुमताने विजयी करण्याचा संकल्प घेतला असल्याची परिस्थिती आहे. नगरसेवक पदाचा व सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव त्यांच्यासोबत असल्याने मतदार त्यांना विजयी करतील. विजयानंतर पुन्हा सत्कार करण्याची संधी मिळेल अशा शुभेच्छा राजेंद्र बाबू दर्डा यांनी सदीच्छा भेटीनंतर दिली आहे. इब्राहीम पटेल यांच्या प्रचाराचा झंझावात प्रभागात सुरू असल्याने विरोधकांनी धास्ती घेतली आहे.
यावेळी ताहेर पटेल, इस्माईल पटेल, शाकेर पटेल, सदफ पटेल, शेख नईम, शेख आसेफ, शेख आरेफ, श्रीराम इंगळे, रफीक पटेल, अब्बु पटेल, सरनवाज अन्सारी, शफी मौलाना, फेरोज खान, फय्यू शेख, निसार पटेल, शौकत पटेल, खालिक देशमुख, शेख हुजुर, शेख अस्लम, बिस्मिल्ला खान, जाकेर पटेल व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?