बुलडोझर कार्यवाई विरोधात एसडिपिआय रस्त्यावर...

बुलडोझर कारवायांविरोधात एसडीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -
सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शहरातील बुलडोझर कारवायांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. या कारवायांमुळे सामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकार, विशेषतः भारतीय संविधानातील कलम 19 (स्वातंत्र्याचा हक्क) आणि कलम 21 (जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क) यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
आंदोलनादरम्यान, पक्षाने महाराष्ट्राचे राज्यपाल आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून बुलडोझर कारवायांमुळे प्रभावित कुटुंबांचे निवासस्थान, उपजीविका आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात आल्याचे नमूद केले. तसेच, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवर होणाऱ्या कारवायांमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना आणि सांस्कृतिक वारसाचे नुकसान होत असल्याचेही पक्षाने अधोरेखित केले.
दिलेल्या निवेदनात या मागण्या केल्या,
भ्रष्टाचाराची चौकशी, अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र तपास समितीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई करावी.
पुनर्वसन आणि भरपाई: प्रभावित कुटुंबांचे योग्य पुनर्वसन आणि भूमी अधिग्रहण कायदा, 2013 अंतर्गत बाजारमूल्याच्या आधारावर त्वरित भरपाई द्यावी.
ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण, शंभर वर्षांपेक्षा जुन्या इमारती आणि धार्मिक स्थळांना राष्ट्रीय वारसा म्हणून संरक्षण द्यावे.
गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी
गुंठेवारी कायदा, 2001 अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया राबवावी.
1% शुल्क: गुंठेवारी अंतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी केवळ 1% शुल्क आकारावे.
चारपट भरपाई भविष्यातील योजनांसाठी निवासी जागांवर आरक्षण आणल्यास बाजारमूल्याच्या चारपट भरपाई द्यावी.
आंदोलनाचे स्वरूप:
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रभावित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. निदर्शनांदरम्यान जोरदार घोषणाबाजी आणि होर्डिंग्जद्वारे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. पक्षाने प्रशासनाला बुलडोझर कारवाया त्वरित थांबवण्याची आणि प्रभावितांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
यावेळी
प्रदेश महासचिव सय्यद कालीम, जिल्हा अध्यक्ष समीर शाह, जिल्हा महासचिव मोहसिन खान, नदीम शेख, अलीम शेख, जिल्हा सचिव साकी अहमद, जिल्हा कोषाध्यक्ष हाफिज समीउल्लाह काझी, जिल्हा सदस्य अशरफ पठान, जबीन शेख, आरेफर शाह, उमर मिर्झा, पूर्व विधानसभा अध्यक्ष हाफिज अबुझर पटेल, फूलंब्री विधानसभा अध्यक्ष रियाझ सौदागर, वंदना ताई, हसीना कौसर, सोहेल पठान, झुबैर पहेलवान यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






