सरकारने शेतक-यांना दिडपट हमीभावाची भुलथाप दिली - अंबादास दानवे

सरकारने शेतकऱ्याना दीडपट हमीभावाची भूलथाप दिली
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका
वैजापूर, दि.8(डि-24 न्यूज) सरकारने शेतकऱ्याना दीडपट हमीभावाची भूलथाप दिली असल्याची गंभीर टीका शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील वाहेगांव येथील गावकऱ्यांशी आज 8 जून रोजी दानवे यांनी संवाद साधला. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या क्या हुआ तेरा वादा...? या जन आंदोलन अंतर्गत अंबादास दानवे यांनी शेतकरी बांधवांशी चर्चा केली.
वृध्दांना 2100 रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन हवेतच विरले. हमीभावाची 'दीडपट' भूलथाप ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे असल्याची भूमिका अंबादास दानवे यावेळी मांडली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अंकुश सुंभ, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, युवासेना जिल्हा युवाधिकारी विठ्ठल डमाळे पाटील, उपतालुकाप्रमुख नागेश चौधरी, बाबासाहेब गव्हाणे, ऋषिकेश मनाळ, विभागप्रमुख पांडुरंग कापे, महेश लिंगायत, अरुण शेलार, बाळू बडक, कल्याणराव मनाळ, युवासेना तालुकाधिकारी अमोल चव्हाण, भाऊसाहेब अमराव, शाखाप्रमुख कृष्णा हिवाळे, पद्माकर मनाळ, संजय पगारे, संपत मनाळ, अनिल पारखे, दौलत मनाळ, बंडू टगरे, अभिषेक मनाळ, रामचंद्र हिवाळे, दत्तू मनाळ, दादासाहेब पतंगे व गणेश हिवाळे उपस्थित होते.
What's Your Reaction?






