मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे चला वाचूया स्वतःला घडवूया उपक्रम

 0
मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे चला वाचूया स्वतःला घडवूया उपक्रम

मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे

चला वाचूया स्वतःला घडवूया उपक्रम संपन्न

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे आज गोष्टीचा शनिवार कार्यक्रमांतर्गत डी मार्टच्या वतीने देण्यात आलेल्या वाचनालयातील पुस्तकांचा वापर करत चला वाचू या स्वतःला घडवू या हा उपक्रम मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गोष्टींचे पुस्तक वाचत असताना समज पूर्वक वाचन,आशय पूर्ण वाचन, नाट्य वाचन वेगवेगळे उतारे सादर केले.

या उपक्रमाचे आयोजन डी मार्ट च्या शिक्षिका आकांक्षा जोशी, पूजा आचारी, सुप्रिया प्रधान यांनी केले होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या वाचनामध्ये अनेक असे आशयपूर्ण वाक्यांचा समावेश केला होता यामध्ये विशेषता, पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधी, नतमस्तक होत नाही

याप्रसंगी आकांक्षा जोशी यांनी विद्यार्थ्यांना इतरांच्या मतांचा आणि विचारांचा सन्मान करणे व सर्वांचा आदर करणे.तसेच नुसतेच वाचन नको आहे वाचन पचनी पडले पाहिजे केलेल्या वाचनाने जीवनही वचनबद्ध घडले पाहिजे डोक्या डोक्यात मनापासून सदविचारांची भरणा व्हावी. अन न वाचणारांनी कसोशीने वाचण्यासाठी प्रेरणा घ्यावी. असे सांगितले.

याप्रसंगी सुरेखा महाजन, प्रकाश इंगळे, संगीता चौधरी, मनीषा नगरकर , सूर्यमाला जाधवर, किरण पवार, प्रणिता खंदारे उपस्थित होत्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow