1200 केंद्राध्यक्ष व मतदान अधिका-यांना नोटीस, रुजू झाले नाही तर गुन्हे दाखल होणार...

 0
1200 केंद्राध्यक्ष व मतदान अधिका-यांना नोटीस, रुजू झाले नाही तर गुन्हे दाखल होणार...

1200 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना नोटीस

 24 तासाच्या आत रुजू व्हा, नाहीतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल...

 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)—छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 28 डिसेंबर रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या निवडणुकीसाठी एकूण 8 हजार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1 ते 8 यांच्या अंतर्गत प्रत्येकी 1 हजार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी याप्रमाणे एकूण 8 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा; एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड तसेच मुख्य नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

येथील 28 डिसेंम्बर रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

वर नमूद चार स्थळांवर एकूण 2000 पैकी 689 मतदान केंद्राध्यक्ष अनुपस्थित होते. याच प्रमाणे एकूण 2000 पैकी 334 मतदान अधिकारी-1, एकूण 2000 पैकी 519 मतदान अधिकारी-2 आणि एकूण 2000 पैकी 474 मतदान अधिकारी-3 अनुपस्थित होते. याप्रमाणे एकूण 8000 पैकी एकूण 2016 मतदान अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. 

आज अनुपस्थित 2016 कर्मचाऱ्यांपैकी 1200 कर्मचाऱ्यांना नोटिसा काढण्यात आले आहेत.

अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी दिले होते, यानिमित्त 1200 कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आले आहेत. त्यांनी 24 तासाच्या आत निवडणूक कामासाठी रुजू व्हावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow