मेगा जाॅब फेअर मध्ये शेकडो युवकांना मिळाला रोजगार...

मेगा जाॅब फेअर मध्ये शेकडो युवकांना मिळाला रोजगार...
मुस्लिम मुलींची जाॅबसाठी लक्षणिय उपस्थिती...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद) शुक्रवारी डाॅ.रफीक जकारिया काॅलेज फाॅर वुमन नौखंडा परिसरात आयोजित मेगा जाॅब फेअर मध्ये हजारो युवकांनी लाभ घेतला. तरुण तरुणींनी मुलाखतीनंतर समाधान व्यक्त करत प्रतिसाद दिला. या जाॅब फेअर मध्ये 39 नामांकित कंपनी व रिक्रुटर्स यांनी 7700 हुन अधिक जागेसाठी 1203 युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये 526 उमीदवारांना नोकरी मिळाली.
मेगा जाॅब फेअरचे आयोजन असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल(AMP) ने हमदर्द लर्निंग एण्ड वेलफेअर सोसायटी(HLWS), रोजनामा एशिया एक्स्प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.
HLWS चे कार्यकारी सचिव शौकत मुफ्ती यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले AMP सोबत काम करताना आम्हाला यश मिळत आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी देशभरात हे काम करायचे आहे. देशाच्या कानाकोप-यातील युवकांना याचा लाभ मिळेल. प्राचार्य डाॅ.मगदूम फारुकी सांगितले या जाॅब फेअरला कमी वेळेत जास्त प्रतिसाद मिळाला आहे. याबद्दल समाधान मिळत आहे. या जाॅब फेअर मध्ये मुलींचा प्रतिसाद मिळाल्याबद्दल आनंद झाला. शहरात युवकांमध्ये स्किल्स व उच्च शिक्षा भरपूर असल्याने नेहमी असले जाॅब फेअर आयोजित केले तर गरजूंना रोजगार मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रोजनामा एशिया एक्सप्रेसचे संपादक यांनी जाॅब फेअरला प्रतिसाद मिळाल्याबद्दल युवक युवतींचे आभार मानले. हजारो युवक युवतींनी उपस्थित राहुन मुलाखती दिल्या व शेकडो युवकांना रोजगार मिळाल्याबद्दल असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स व हमदर्द लर्निंग एण्ड वेलफेअरचे आभार व्यक्त केले.
What's Your Reaction?






