वीजेचे तांडव, वीज पडून 4 शेतकरी ठार, दोन भावांचा समावेश, 4 जखमी, 5 जनावरे दगावली

वीजेचे तांडव, वीज पडून 4 शेतकरी ठार, दोन भावांचा समावेश, 4 जखमी, 5 जनावरे दगावली
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज), जिल्ह्यात माणसून पावसाच्या आगमनाच्या पावसात विजेचे तांडव सुरु आहे. आज सिल्लोड तालूक्यात विज पडून चार शेतक-यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. कन्नड तालूक्यात तीन जण विज पडून गंभीर जखमी झाले आहे. सिल्लोड तालूक्यात चार तर कन्नड तालूक्यात एक जनावर दगावल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
पाऊस सुरु असल्याने शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहे परंतु पावसासोबत आभाळातून वीजा पडत असल्याने जीवाचा संकट ओढवले जात आहे.
सारोळ्यात दोन सख्खे भाऊ शेतात पेरणी करत असताना मुसळधार पाऊस सुरू झाल्याने झाडाच्या आस-याखाली उभे असताना रोहित राजू काकडे, वर 21 व यश राजु काकडे, वय 14 या दोन सख्ख्या भावांचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला. दोघे भावांचा मृत्यू झाल्याने आई वडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पिंपळदरी येथील शेतकरी शिवराज सतीश गव्हाणे, वय 28, या तरुण शेतक-याचा मृत्यू झाला आहे. त्याचा भाऊ जीवन सतीश गव्हाणे, वय 20, हा तरुण गंभीर जखमी आहे. उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. मोढा बुद्रुक येथील रंजना बापू शिंदे, वय 50, दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी परत येत असताना अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यूमुखी पडल्या.
कन्नड तालूक्यातील बोकनगाव येथील नितीन भीमराव शिंदे, वय 23, शेतात मका लागवड करत असताना बाजूला विज पडून त्यांना करंट बसला त्या घटनेत ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. बोलटेक येथील दादाराव तुकाराम पवार, वय 60, चंद्रकलाबाई दादाराव पवार, वय 55 हे पती पत्नी झाडाजवळ उभे असताना वीज कोसळली. जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
या नैसर्गिक संकटात सिल्लोड तालूक्यात चार तर कन्नड तालूक्यात एक जनावर वीज पडून दगावले. कन्नड तालूक्यातील मौजे गणेशपुर शिवारातील गट नं.43 मधील खातेदार तातेराव भिमराव पवार यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज पडून मृत्यू पावला. सिल्लोड तालूक्यातील अन्वी शिवारातील गट क्रं.139 मध्ये वीज पडून नारायन सांडू बांबर्डे यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. मांडणा येथील गट नं. 295 मध्ये वीज पडून ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांची तीन वासरे दगावली. जनावरे दगावल्याने शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने शासनाकडून योग्य मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
What's Your Reaction?






