शिरुरमध्ये भोंदु बाबाचा भांडाफोड, अंधश्रध्दा निर्मूलन समीतीची कामगिरी...

शिरुरमध्ये भोंदु बाबाचा भांडाफोड, अंधश्रध्दा निर्मूलन समीतीची कामगिरी...
भोंदु बाबावर गुन्हा दाखल, महीलांच्या नको त्या ठिकाणी हात लावायचा, दारु सोडवण्यासाठी चक्क बुट तोंडात कोंबायचा..
वैजापूर, दि.19(डि-24 न्यूज) -
वैजापूर तालूक्यातील शिरुर येथे अंधश्रध्दा निर्मुलन समीतीने भोंदुबाबाचा भांडाफोड करुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सदस्य रीतेश संतोष होळकर, जगदीश सोज्वळ यांनी हा पर्दाफाश केला आहे. संजय रंगनाथ पगार, वय 50, राहणार शिरुर, तालूका वैजापूर असे त्या भोंदु बाबाचे नाव आहे. तो बाबा दारु सोडवण्यासाठी चक्क तोंडात बुट धरण्यासाठी देत असे. या प्रकरणी महीलांना चुकीच्या ठिकाणी तो स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. बिरोबा मंदीरात तो दरबार भरवून भुत काढणे व बुट तोंडात ठेवून दारु सोडवण्याचा दावा करत होता. त्याचा बुटाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी किशोर शांताराम आगळे यांनी सरकारतर्फे हि तक्रार दाखल केली आहे. वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त लोक शोधून तो बाबा अघोरी प्रकार करत होता. दुपारी एका युवकावर अघोरी कृत्य केल्याचा व्हिडीओत दिसत आहे. मंदीरात बसून एका युवकावर भंडारा टाकून नाकाला बुट लावताना दिसत आहे. यावेळी तो काही मंत्र म्हणत आहे तर दुस-या व्हिडीओत बाबा तरुणाला झोपवून त्याच्या मानेवर पाय, पोटावर पाय ठेवून उपचार करण्याचा ढोंग करत असताना दिसत आहे. याप्रसंगी तो सोड त्याला सोड त्याला नाही तर दोस्ती घालेन असे म्हणतो. बाबाचा परिचय बघितले असता तो लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचे काम करत होता. बिरोबा मंदीरात येणा-या लोकांना तो आपल्या जाळ्यात अडकावयाचा. लोकांना अघोरी सल्ले देत असे. मंदीरात त्याने दरबार भरवण्यास सुरु केले. रविवारी आणि गुरुवारी दोन दिवस दरबार भरवायचा. गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली. तपासात समोर येईल त्याने आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली.
What's Your Reaction?






