अगोदर अपर तहसिलदार आणि आज निवासी उपजिल्हाधिकारी एसिबिच्या जाळ्यात

 0
अगोदर अपर तहसिलदार आणि आज निवासी उपजिल्हाधिकारी एसिबिच्या जाळ्यात

अगोदर अपर तहसिलदार आणि आज निवासी उपजिल्हाधिकारी एसिबिच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ...

काय चाललंय महसूल विभागात, भ्रष्टाचार वाढलाय का सामान्य नागरीकांत चर्चा

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद) 15 मे रोजी अपर तहसिलदार नितीन गर्जे यांच्यावर एसिबिचा छापा पडला आणि आज निवासी उपजिल्हाधिकारी पाच लाख रुपये लाच घेताना एसिबीने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी छत्रपती संभाजिनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना एसिबिने पाच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. आरडिसींनी शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली. यातील पाच लाख रुपये घेतांना त्यांना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

काय आहे प्रकरण...

संबंधित तक्रारदाराला वर्ग-2 ची जमीन वर्ग-1 करायची होती. ती करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे मोठ्या लाचेची मागणी केली. त्यांनी संबंधिताकडे सदरील काम करुन देण्यासाठी 41 लाख रुपये मागितले होते. त्यातील 23 लाख रुपये संबंधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते. तरीही 18 लाखांची पुन्हा मागणी करण्यात आली. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेतांना आरोपिला अटक करण्यात आली. अव्वल कारकून त्रिभुवन मार्फत ही लाच घेण्यात येत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांकडून आरडीसी विनोद खिरोळकर यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रात कर्मचारी पासून अधिकारी पर्यंत लाच घेण्याच्या प्रकरणात वाढ होत आहे हि चिंतेची बाब आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow