डिफेन्स सर्विस करीता विक्रीस असलेल्या मद्यसाठा विक्री करताना पर्दाफाश

 0
डिफेन्स सर्विस करीता विक्रीस असलेल्या मद्यसाठा विक्री करताना पर्दाफाश

डिफेन्स सर्विस करीता विक्रीस असलेला विदेशी मद्यसाठा खुलेआम विक्री करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पर्दाफाश 

औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क् विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे, उप-अधीक्षक अतुल कोटलवार यांचे मार्गदर्शनाखाली ए.बी. चौधरी, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व सहकारी स्टाफ यांनी बाळापुर फाट्याजवळ कमानीजवळ बीडबायपास बाळापुर शिवार येथे वाहन क्रमांक MH-03, CU-8233 होंडा डयुओ या दुचाकी वर वाहतुक करीत असताना वाहन चालक आकाश गोकुळ महानोर रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव यास डिफेंस सर्विस करीता विक्री करीता असलेला मद्यसाठा खुलेआम विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगुन मिळुन आल्याने तसेच या गुन्हयात आरोपी आकाश गोकुळ महानोर यास मदत करणा-या योगेश भगवान राजपुत रा. पडेगाव, यश संजय यादव रा. सैनिक नगर पडेगाव यांना विदेशी मद्याच्या डिफेंस सर्विस करीता विक्री साठी असणारा व महाराष्ट्र राज्यात खुल्या बाजारात विक्री करीता प्रतीबंधीत असलेल्या काँटेसा रम 750 मि. ली. क्षमतेच्या 65 सीलबंद बाटल्या, महाराष्ट्र राज्यात खुल्या बाजारात विक्री करीता प्रतीबंधीत असलेल्या मॅकडॉल नं 1 व्हीस्की 750 मि. ली क्षमतेच्या 12 सीलबंद बाटल्या ,महाराष्ट्र राज्यात खुल्या बाजारात विक्री करीता प्रतीबंधीत असलेल्या रॉयल स्टंग व्हीस्की 750 मि. ली. क्षमतेच्या 11 सीलबंद बाटल्या, ओल्डमंक XXX 750 मि. लीच्या 3 बाटल्या अशा एकुण 91 बाटल्या जप्त करण्यात आल्या मोबाईल व वाहनासह मुद्देमालाची किंमत 150770 आला आहे.

सदरील गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री. आनंद चौधरी हे करीत आहे.

सदरच्या छापा पथकात निरीक्षक आनंद चौधरी यांचे सह दुय्यम निरीक्षक गणेश पवार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे, प्रविण पुरी, ए.के. सपकाळ, जवान चेतन वानखेडे, ज्ञानेश्वर सांबारे, हनमंत स्वामी जवान नि वाहन चालक किशोर सुंदडे यांचा सहभाग होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow