महापालिकेच्या इतिहासात प्रथमच डिसेंबर मध्ये शंभर कोटी करवसुली
महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच डिसेंबर महिन्यामध्येच मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसूली शंभर कोटी
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) सन 2023-24 या आर्थिक वर्षात 250.00 कराचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सुचनेनूसार उप-आयुक्त (२) अपर्णा थेटे यांनी सहा. आयुक्त यांना बैठकीत केलेल्या मार्गदर्शनानुसार वसूली वाढविण्यासाठी सांगितले. वसूली कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे नेमून दिलेल्या मिळकतींचा गुगल शिटवर डेटा तयार करून दिला. यासाठी आयुक्तांनी जीएसटी मधील श्री. राजीव झाडे यांची सेवा अधिग्रहीत करून त्यांनी यासाठी परिश्रम घेतले.
त्यानुसार उप-आयुक्त (२) अपर्णा थेटे यांनी सहा. आयुक्त यांना मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीस देणे, सुट्टीच्या दिवशी वसूलीसाठी झोन कार्यालय सुरू ठेवणे, बैठका घेणे, मालमत्ताधारकांना दोन टक्के शास्तीची माहिती देणे, कर भरण्यासाठी परावृत्त करणे इत्यादी प्रयत्न करून त्याचा चांगला परिणाम म्हणून दिनांक 1-4-2023 ते 7-12-2023 पर्यंत 100 कोटी वसूली केली. सन 2022-23 मध्ये दिनांक 1-4-2022 ते 14-2-2023 पर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी
अशी एकत्रित वसूली 100.39 कोटी झाली होती. सन 2021-22 मध्ये दिनांक 1-4-2021 ते 31-12-2021 पर्यंत मालमत्ता कर व
पाणीपट्टीची एकत्रित वसूली 100 कोटी झाली होती.
तसेच सन 2018-19 मध्ये एप्रिल-2018 ते जुलै-2018 या चार महिन्यामध्ये दोन टक्के शास्तीची सूट देऊनही संपूर्ण आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 109.79 कोटी व पाणीपट्टी 26.26 कोटी 136.05 कोटी इतकी झाली. या वर्षात मालमत्ताधारकांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही.
सन 2019-20 मध्ये संपूर्ण वर्षात मालमत्ता करापोटी 115.37 कोटी व पाणीपट्टी 29.29 कोटी असे एकूण 144.66 कोटी वसूली झाली.
या वर्षात दोन टक्के शास्तीची सूट नसल्याने देखील मालमत्ताधारक कराचा भरणा करीत
आहे. तरी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
What's Your Reaction?