हिंदूत्ववादी संघटनांच्या वतीने शौर्य दिन निमित्ताने महाआरती

 0
हिंदूत्ववादी संघटनांच्या वतीने शौर्य दिन निमित्ताने महाआरती

हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने शौर्य दिन निमित्ताने महाआरती

 

 

छत्रपती संभाजीनगर, दि.6 (डि-24 न्यूज) हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने 6 डिसेंबर हा शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शुक्रवारी (ता.६) भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुलमंडीतील सुपारी हनुमान आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्यावतीने औरंगपुऱ्यातील दक्षिणमुखी मारोती मंदिरात आरती करण्यात आली. 

भाजपच्यावतीने आयोजित महाआरतीत खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, मराठवाडा कार्यालय मंत्री धनंजय कुलकर्णी, दयाराम बसैय्ये, कचरु घोडके, शहर सरचिटणीस जालिंदर शेंडगे, अमृता पालोदकर, अनुसूचित आघाडीचे शहराध्यक्ष लक्ष्मण शिंदे, बंटी चावरिया, अजिंक्य कुलकर्णी, राधाकृष्ण गायकवाड, मुकुंद लाडकेकर, संजय खनाळे, सोहन प्रधान, महिला आघाडीतील सविता कुलकर्णी, मनिषा भन्साळी, मीना मीसाळ, छाया खाजेकर यांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने आयोजित आरती वेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे देवगिरी प्रांत अध्यक्ष सुभाष मकरिये यांच्यासह किरण सुरे, सचिन राठोड, शेखर ढोले, अवधूत देशमुख, दिनेश जांगीड, विपुल साळुंखे, उमेश राठोड, कार्तिक गनपुरे, सुनील पानचलरे, अभय वाघ यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow