पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीचा निवडणूक निरीक्षकांकडून आढावा

 0
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीचा निवडणूक निरीक्षकांकडून आढावा

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीचा निवडणूक निरीक्षकांकडून आढावा...

औंढा नागनाथ येथील मतदान केंद्र व उपकोषागारातील स्ट्राँग रूमची पाहणी...

हिंगोली, दि.21 (डि-24 न्यूज) -: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक माधुरी खोडे यांनी आज औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 415 तसेच उपकोषागार कार्यालयातील स्ट्राँग रूमची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री. सरोदे, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने आणि औंढा नागनाथचे तहसीलदार हरिश गाडे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राची व्यवस्था आणि स्ट्राँग रूमची पाहणी करून निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली.

औंढा नागनाथ तालुक्यात चार मतदान केंद्रे...

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार आहे. औंढा नागनाथ तालुक्यात एकूण चार मतदान केंद्रे असून, त्यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 415 वर 468, केंद्र क्रमांक 416 वर 465, केंद्र क्रमांक 417 वर 290 आणि केंद्र क्रमांक 418 वर 240 मतदार आहेत. या चारही केंद्रांवर मिळून एकूण 1 हजार 463 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow