घाटी प्रशासनाला राष्ट्रवादीने दिले निवेदन, मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना करा

 0
घाटी प्रशासनाला राष्ट्रवादीने दिले निवेदन, मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना करा

घाटी प्रशासनाला राष्ट्रवादीने दिले निवेदन, मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना करा...

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) रुग्णालयातील मृत्यु दर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याकडे गांभीर्यपूर्वक

लक्ष देऊन गरीब रुग्णांचे प्राण वाचविण्यात यावे. 

अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादीने अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांना केली आहे. जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन शिष्टमंडळाने दिले.

निवेदनात म्हटले आहे 

आपल्याकडील आरोग्य तपासणी यंत्रे सुविधांचा परिपुर्ण वापर होत नाही, त्यामुळे सामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड नाहक सोसावा लागत आहे. रुग्णासाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा.

रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे दाखल रुग्ण चांगला होण्याऐवजी अजुन जास्त आजारी पडत आहे. स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे.

ग्रामीण भागातुन आलेल्या रुग्णांना सहकार्य, मार्गदर्शन योग्य प्रकारे आपल्या यंत्रणेकडून होत नाही या बाबतीत जाणीवपूर्वक लक्ष देण्यात यावे.

 रुग्णांच्या नातेवाईकांसाठी थांबणे, पाणी, स्ट्रेचर, शौचालय व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहेत परंतु यावर कार्यवाही न झाल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल याची आपणास जाणीव करुन देण्यात येत आहे.

याप्रसंगी सुधाकर सोनवणे, राज्य प्रवक्ते सुरजितसिंग खुंगर, मोतीलाल जगताप, सोमिनाथ शिराणे, मेहराज पटेल, एड लक्ष्मण पाटील प्रधान, सत्यजित वाघ, प्रा.सलिम शेख आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow