लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून उमेदवारांची चाचपणी, मनसे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार
लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून उमेदवारांची चाचणी: बाळा नांदगावकर
भोंगे आणि डीजेबाबत भुमिका स्पष्ट, धर्माच्या नावाखाली निवडणुका नको तर विकासाच्या मुद्यावर लढावे
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जय्यत तयारी सुरू केली असून. राज्यात 20 ते 25 जागेवर मजबूत उमेदवार देण्यासाठी पक्षाच्या वतीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. अशी माहिती मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली श्री नांदगावकर हे गेल्या दोन दिवसांपासून शहरात ठाण मांडून बसले आहेत. विधानसभा निहाय आढावा घेत त्यांनी पदाधिकारी सोबत चर्चा केली.
विधानसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र बैठका घेत पक्षाची स्थिती बघितली.
त्यांनी आज शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, ते पुढे म्हणाले जाती धर्माच्या नावावर निवडणुका नको तर विकासाच्या मुद्यावर व्हावे अशी पक्षाची भूमिका आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेत पक्षाचे काम राज्यात सुरु आहे. नवयुवकांना पक्षाची उमेदवारी देण्याचा विचार आहे. मस्जिदचे भोंगे विरोधात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलन उभे केले होते मनसे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर गणपती उत्सवानिमित्त डिजेच्या आवाजाला सुध्दा राज ठाकरे यांनी विरोध केला होता. खरे बोलायची त्यांची सवय आहे. या निवडणुकीत एकला चलोची भुमिका आहे. विविध पक्षांचे नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी येतात, शिरा, पोहे खातात आणि जातात, त्यांना माध्यमांनी विचारले असता ते बोलतात सदिच्छा भेट घेण्यासाठी येतात. ते असे का बोलतात, युतीबाबत काही पक्षांसोबत बोलनी सुरू आहे का...? त्या नेत्यांच्या व पक्षाविरुद्ध राज ठाकरे यांनी बोलू नये म्हणून ते असे बोलतात. सध्याची राजकीय परिस्थिती बघता मनसेने कोणासोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सक्षम उमेदवार देण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे उच्चशिक्षित आहेत, चांगले व्यक्ती आहे अशी स्तुती सुमने बाळा नांदगावकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात उधळली.
नांदेड व औरंगाबाद घाटीत रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेवर त्यांनी आरोग्य यंत्रणा मजबूत करावी, रिक्त जागा भरावी व औषधांचा पुरवठा करावा, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे सोबत येतील का या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले सध्या तसा काही विचार नाही, उध्दव ठाकरे काँग्रेस सोबत गेले तर राष्ट्रवादीचा एक गट भाजपासोबत गेला हे काय चाललंय राज्यातील राजकारणात जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राजकीय पक्षांची विचारधारा राहिलेली नाही, मनसेने विचारधारा बदलली नाही, महाराष्ट्राचा विकास, मराठी माणूस व हिंदूत्व हाच एजंडा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता मनसेसोबत येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मनसेचे नेते दिलिप बापू धोत्रे, संतोष नागरगोजे, सतनाम सिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, अशोक पवार आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?