आदर्श घोटाळ्यातील पैसे परत मिळवून देणार- सहकारमंत्री दिलिप वळसे पाटील

आदर्श घोटाळ्यातील पैसे परत मिळवून देणार- सहकारमंत्री दिलिप वळसे पाटील, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी वळसे पाटील यांनी साधला संवाद
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) मराठवाड्यातील एकामागून एक पतसंस्थेतील घोटाळे समोर येत आहेत. यामुळे खातेदार त्रस्त होऊन आत्महत्या करत आहे. एकेक खातेदारांचे लाखोंच्या ठेवी अडकून पडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात लाखो खातेदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आदर्श पतसंस्थेतील खातेदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले. मोर्चे व धरणे आंदोलन करत प्रशासनावर दबाव आणला आणि कार्यवाही सुरू झाली. सहकारमंत्री दिलिप वळसे पाटील शहरात आले असता आदर्श पतसंस्था व अजिंठा अर्बन बँकेतील खातेदारांची कोट्यावधी रुपयांची रक्कम अडकली आहे. घोटाळा झाला तरीही सहकार विभागातील अधिकारी यांनी लवकर कार्यवाही केली नाही यामुळे दिरंगाई झाली. या प्रकरणी उत्तर देताना सहकारमंत्री दिलिप वळसे पाटील म्हणाले ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. खातेदारांचे पैसे बुडणार नाही. सरकार योग्य ती कारवाई करत आहे. सहकार विभागाचे लक्ष याकडे आहे. मी बैठक घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयचेही या पतसंस्थांवर नियंत्रण असते. अनियमितता झाली आहे. घोटाळे करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. अशा घटनांमुळे सहकार खात्याची बदनामी होते. तसेच सहकार चळवळीला धक्का पोहोचतो. ठेवीदारांनी धीर धरावा असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक आयोगासमोर शरद पवार गट व अजित पवार गटाची आजपासून सुनावणी सुरू झाली. पक्षाचे नाव व चिन्ह आम्हाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्हाला निवडणूक आयोगावर विश्वास आहे. असे ते म्हणाले. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते.
What's Your Reaction?






