ऑटो चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे आमरण उपोषण, 10 जानेवारी पासून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा
ऑटो चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे आमरण उपोषण, चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) विविध मागणीसाठी व हिट एण्ड रन कायद्याविरोधात ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. हिट एण्ड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी 10 जानेवारीपासून रिक्षा बंद करून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त यांना निवेदनात म्हटले आहे यापूर्वी चालक मालक संघटनेच्या वतीने विविध मागणीसाठी वेळोवेळी निवेदने देऊन मागणी मान्य केली नाही म्हणून आमरण उपोषणाला बसले आहे.
रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी. कंपनीच्या बसेस, खाजगी वाहने, सिटी बस यांच्याकडून होणा-या अवैध वाहतुकीला आळा बसविण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथके नेमण्यात यावी. ऑनलाईन पावतीच्या दंडामध्ये 75 टक्के सूट देण्यात यावी. ई-चलन पध्दत बंद करून जूनी पध्दत लागू करण्यात यावी. शहरातील खुले परवाने त्वरित बंद करण्यात यावे. महानगरपालिका जोपर्यंत रिक्षाचालकांना थांबे व पिकअप, ड्राॅप पाॅईंट देत नाही तोपर्यंत वाहतूक शाखेने नो पार्किंगची ऑनलाईन पावतीची कार्यवाही करु नये. ई-रिक्षाचे कोणतेही धोरण निश्चित नसताना ई-रिक्षाकडून अवैध प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी. आरटीओने चालकांचे लायसन्स नुतनीकरण झाल्यावर पोस्टाने न पाठवता चालकांच्या हातात द्यावे. स्मार्ट सिटी बस फक्त मनपा हद्दीमध्ये चालवावी, ग्रामीण भागातील फे-या बंद करावे.
ऑटो रिक्षाचे शेअरिंगचे दर निश्चित करुन दरफलक त्वरित लावून देण्यात यावे. शहरातील डबल परवाने व परिवहन कार्यालयातील जी-फाॅर्म देणा-या अधिका-यांची गुप्त चौकशी करून कारवाई करावी. प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कायमस्वरूपी प्रादेशिक अधिकारी व दोन उप प्रादेशिक अधिकारी यांची नियुक्ती करावी. प्रोझोन माॅल , सिध्दार्थ गार्डन, बाबा पेट्रोल पंप, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, सिडको बसस्थानक, विमानतळ येथील रिक्षाथांबे त्वरित मंजूर करण्यात यावे. हिट एण्ड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी 10 जानेवारी पासून रिक्षा बंद करून चक्काजाम करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
उपोषणकर्ते जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचे जिल्हाध्यक्ष शेख लतिफ, संस्थापक अध्यक्ष भिमसेना ग्रुप वाळूज, संजय दोडके, शहराध्यक्ष सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया सचिन गायकवाड हे बसले आहे. निवेदनात शहराध्य शेख सरवर यांची सही आहे. आंदोलनाला तेरा संघटनेचा पाठिंबा आहे.
टायगर रिक्षा युनियन नांदेड, भिमसेना रिक्षा संघटना, न्यू जनता रिक्षा युनियन, परिवर्तन रिक्षा संघटना, वस्ताद दल रिक्षा चालक मालक संघटना, वाय. एफ. खान रिक्षा युनियन, मराठवाडा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया, बहुजन हिताय रिक्षा चालक मालक संघटना, वंचित बहुजन आघाडी, छावा, एकता रिक्षा संघटना दौलताबाद यांचा पाठिंबा आहे.
What's Your Reaction?