नोकरी महोत्सवात मिळाला शेकडो युवकांना रोजगार...!

 0
नोकरी महोत्सवात मिळाला शेकडो युवकांना रोजगार...!

नोकरी महोत्सवात मिळाला शेकडो युवकांना रोजगार...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद),दि.25(प्रतिनिधी) आज भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जवळ जयसिंगपूरा परिसरात समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय वाघमारे मित्र मंडळाच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवात(Job Fair) मध्ये सकाळी 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत 300 युवकांनी नोंदणी करुन मुलाखत दिली. यामुळे शेकडो तरुणांना रोजगाराची संधी पाच कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

या जाॅब फेअरमध्ये व्होराॅक, इंडोरन्स, धुत, एटिसी, अजिंठा प्रकाशन या कंपन्यांनी सहभाग घेत नोकरी महोत्सव यशस्वी केले. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. औरंगाबाद शहर, हिंगोली, लातूर, येवला, वैजापूर, खुलताबाद, लोणी येथून दहावी, बारावी, पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांनी नोंदणी करुन मुलाखत दिली. रविवारी पात्र युवकांना नोकरीचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजक संजय वाघमारे यांनी दिली आहे.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ.राहुल सौदेकर, इंजिनिअर विक्की बोरीकर, अनिल केदारे, अमोल कांबळे, अॅड अनिस पटेल, सय्यद हमीद, सर आसिफ, शौकत कुरेशी, सईद खान, शफी कुरेशी, मोईनोद्दीन जहागिरदार, नाजेम अन्सारी, हाफिज मुख्तार, शेख मुश्ताक आदी उपस्थित होते. सय्यद राहिल, वसिम अतार, अहेमद मोहीयोद्दीन, मोहम्मद अश्फाक, मोहम्मद शहेबाज, मुस्तफा जैद, मोहम्मद अजहर, मोहम्मद इरफान, अजिम ख्वाजा, शेख मोबीन आदींनी परिश्रम घेत

ले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow