भरपावसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

 0
भरपावसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

भरपावसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.25(डि-24 न्यूज) आज शहर व जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाजपा सरकार शेतकरी विरोधी असुन त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दिवसेंदिवस शेतक-यांची आत्महत्या वाढत चालल्या आहे. मराठवाडयामध्ये दुष्काळ पडलेला आहे. तरी शासन शेतक-यांकडे लक्ष न देता उदयोगपतींचे कोट्यवधी कर्ज माफ करत आहे. म्हणुन काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या विरोधात तीव्र धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भर पावसात भाजपा सरकार आणि शिंदे सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणुन सोडला. केंद्र व राज्य सरकारने सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

 यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलासबापु औताडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. जफर अहमद खान, माजी शहर अध्यक्ष इब्राहीम पठाण, किरण पाटील डोणगांवकर, अ‍ॅड.सय्यद अक्रम, भाऊसाहेब जगताप, अ‍ॅड.इकबालसिंग गिल, दिपाली मिसाळ, अनिस पटेल, डॉ.अरुण शिरसाठ, मोईन ईनामदार, आकेफ रजवी, महेंद्र रमंडवाल, जयप्रकाश नारनवरे, शेख रईस, विनायक बोरसे, कल्याण जंगले पाटील, इंजि.इफतेखार शेख, राहुल सावंत, इरफान इब्राहिम पठाण, रेखा राऊत, अनिता भंडारी, चंद्रप्रभा खंदारे, शेख सबीया बाजी, विदया लांडगे, नदीम सौदागर, विदया घोरपडे, श्रीकृष्ण काकडे, रुबीना सयद, योगेश थोरात, मजाज खान, निमेश पटेल, रज्जाक शेख, शेख कैसर बाबा, शफीक शहा सयद फयाजोददीन, सलीम खान, बु-हान पटेल, सलमान खान, इम्रान खान, कल्याण चव्हाण,मोहम्मद जाकीर, आमेर रफीक खान, विजय कांबळे, आकाश रंगडे, शाहुराज कांबळे, आबेद जहागीरदार, इम्रान जहागीरदार, शेख रज्जाक आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow