अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष म्हणत राष्ट्रवादीने केले आंदोलन

 0
अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष म्हणत राष्ट्रवादीने केले आंदोलन

अर्थसंकल्पात एकच दोष 

महाराष्ट्र रोष.. महाराष्ट्र रोष.. भाजपा केंद्र सरकारचा जाहीर निषेध 

छ. संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)

आज जिल्हा ग्रामीण व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे क्रांती चौक येथे केंद्र सरकार विरोधात घोषणा देत निषेध करून आंदोलन करण्यात आले. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला अर्थ संकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र राज्य हे देशातच आहे की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे या अर्थसंकल्पात उद्यापासून सुरू होणाऱ्या जाहिरातबाजीसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी काही ठोस निधी सोडा पण इतर राज्याप्रमाणे तर समाधान मानले असते एनडीए सरकारला कमी जागा मुळे त्याचे परिणाम भोगावे लागले अशी भाजपची प्रवृत्ती येथून स्पष्ट होत आहे. इतर राज्यांना दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राला अर्थसंकल्प 2024 मधून काहीही मिळालेले नाही ही त्रिवार सत्य आहे. 

 महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावरील अन्याय सहन करणार नाही. राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना लक्षात घेऊन भाजप पक्षाविरुद्ध निषेध व्यक्त केला. 

 अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष असे बॅनर लावून क्रांती चौक या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आंध्रप्रदेश, बिहार राज्याला बजेटमध्ये झुकते माप दिले परंतु महाराष्ट्राला जास्त निधी का नाही असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला.

 या आंदोलनात जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, खाजा शरफोदिन मुल्ला, अभिषेक देशमुख, मोतीलाल जगताप, विठ्ठल जाधव, राजेश मोरे, रघुनाथ पाटील, राजू बापू साळुंखे, मंजाहरी गाडे पाटील, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, रज्जाक पठाण, राहुलकुमार ताठे, उद्धव बनसोडे, शेख शफिक, प्रशांत जगताप, भूषण तांबे, सुशील बोर्डे, विलास मगरे, रवींद्र तांगडे,अशोक धनगावकर, सोमनाथ धायडे, प्रभाकर भोसले, अशोक बनकर, अशोक मस्के, एडवोकेट गायके, अजिंक्य किरजत, आनंद मगरे, तुषार आहेर, एड लक्ष्मण प्रधान, शैलेंद्र खन्ना, आबा सावदेकर, सुमित पवार, रश्मीत सिंग बिंद्रा, विनाताई खरे, सलमा बानो, धनश्री तडवळकर, गजाला जमादार, लीलाताई मगरे, प्राप्ती वैष्णव आदींची यावेळी उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow