फडणवीस हे अशोक चव्हाण यांना लीडर नाही तर डिलर म्हणत होते मग डिल कशासाठी - उध्दव ठाकरे यांचा घणाघात

 0
फडणवीस हे अशोक चव्हाण यांना लीडर नाही तर डिलर म्हणत होते मग डिल कशासाठी - उध्दव ठाकरे यांचा घणाघात

फडणवीस अशोक चव्हाण यांना लीडर नाही डिलर म्हणत होते मग डिल कशासाठी केली- उध्दव ठाकरे

आम्ही शिवरायांचे भक्त मोदींचे नाही, शहराचे नामांतर केले याचा सार्थ अभिमान, गद्दारांना निवडणुकीत नेहमीसाठी गारद करण्याचे केले आपल्या भाषणात उध्दव ठाकरेंनी आवाहन...

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) फडणवीस यांनी नांदेडच्या प्रचार सभेत अशोक चव्हाण हे लीडर नाही तर डिलर आहे असे सांगितले होते मग त्यांच्याशी डिल केली का असा प्रश्न आपल्या जनसंवाद सभेच्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. जर मोदी त्यांना भाजपात राज्यसभेची जागा देत असतील तर आम्ही पण शहिदांचा अपमान केला असल्याचे समजू कारण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी आदर्श घोटाळा करुन अशोक चव्हाण यांनी शहीदांचा अपमान केला असल्याचा आरोप केला होता. जेव्हा माझ्या कार्यकर्त्याला मारले जात होते तेव्हा गृहमंत्री झोपले होते का...? एवढी गुन्हेगारी महाराष्ट्रात कधी बघितली नाही. आता फडणविसांची तुलना एखाद्या प्राण्याशी करणे पण त्या प्राण्याचा अपमान होईल. अशी टिका त्यांनी केली. अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता ठाकरे म्हणाले आमची सत्ता आली तर जेलमध्ये टाकू. भाजपा आता गयारामांचा पक्ष बनला आहे एक वेळ अशी येईल की काँग्रेसचा नेता भाजपाचा अध्यक्ष असेल. शहरातील मर्द मावळे गद्दारांना सोडणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. भेकड आणि भाकड भाजपात घ्या पण माझ्याकडे प्रमाणिक लोक राहतील तेच सर्वांना भारी पडतील तीच माझी ताकत आहे. भाजपकडे हिंदूत्वाचे बोगस बी-बीयाने आहे पण आमच्याकडे प्रमाणिक लोक आहे. भाजपा आता आयारामांचा पक्ष बनला आहे असा घणाघात ठाकरेंनी केला.

मोदींनी भारतरत्नांचा बाजार मांडला असल्याचा घणाघात करत त्यांनी सांगितले पंधरा दिवसांत पाच जणांना भारतरत्न जाहीर केले. ज्या राज्यात दिले तेथील मते मिळतील म्हणून असले निर्णय घेण्यात आले. स्वामिनाथन यांना भारतरत्न दिले आम्हाला अभिमान आहे मग त्यांच्या आयोगाने केलेल्या शिफारशी लागू करा. शेतकऱ्यांना हमीभाव द्या, कर्जमाफी द्या, नैसर्गिक आपत्तीत मोदी बघायला सुध्दा आले नाही मदतही मिळाली नाही. स्वामिनाथन यांच्या शिफारस लागू करा तुमचे स्वागत करु. महाराष्ट्रातील करभरणा हिस्सा वाढवून द्या मग बघा विकास कसा होत नाही. केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता निवडून द्या एका रुपयातून 25 ते 50 पैसे परतावा मिळवू असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.

मोदी आणि फडणवीस यांच्या भाषणाची क्लिप यावेळी जनसंवाद सभेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माईकमध्ये लाऊन ऐकवली. मोदींनी नांदेडात जाऊन अशोक चव्हाण विरोधात भाषण केले. चव्हाण किती भ्रष्टाचारी आहेत सांगितले. तर त्यांना आदर्श घोटाळ्यात भाजपा जेलमध्ये टाकणार होती म्हणून ते भाजपात जात असल्याचा आरोप केला. मोदी आणि फडणवीस चव्हाण विरोधात काय बोलले होते आणि आत्ता कशी परिस्थिती बदलली यांचे विश्लेषण आपल्या भाषणात केले. अब्दुल सत्तार यांच्यावर सुध्दा त्यांनी आपल्या भाषणात तोफ डागली. 14 पानांचे पुरावे दिले तरी ईडी कार्यवाही करत नसेल तर आमची सत्ता आली तर सोडणार नाही त्यांना जेलमध्ये टाकू असा इशारा यावेळी राऊतांनी दिला.

विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणात सांगितले की शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी 2500 कोटी रुपये दिले. नवीन पाण्याच्या पाईपलाईनसाठी 1600 कोटी, रस्त्यांसाठी 250 कोटी, गुंठेवारी व कच-याचा प्रश्न सोडवला. सुभाष देसाई पालकमंत्री असताना अनेक विकासकामे झाली तर 2700 कोटी पाण्याच्या पाईपलाईनसाठी खर्च वाढला असला तरी आतापर्यंत फक्त 23 km पाईपलाईनचे काम झाले. 57 जलकुभातून फक्त 25 पूर्णत्वास आले. शिवसेनेचे महापौर असताना तीन चार दिवसाआड पाणी येत होते तर आता आठ दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. साधा पाणीप्रश्न सुध्दा भाजपला सोडवता आला नाही अशी टिका अंबादास दानवे यांनी केली.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, इम्तियाज जलील व डॉ.भागवत कराड यांच्यावर भाषणात खरमरीत टीका केली.

ईडीकडे एवढा मोठा गठ्ठा पुरावा दिला तरीही कोणतीही कारवाई अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी, वरुण सरदेसाई, बाळासाहेब थोरात, सुदाम मामा सोनवणे, अनिल पोलकर, राजू वैद्य, सुशिल खेडकर, बंडू ओक, संतोष जेजूरकर, आनंद तांदूळवाडीकर, राजीव इंगळे, डॉ.शोएब हाश्मी, ऋषीकेश खैरे, हनुमंत शिंदे, रेखाताई आऊलवार, प्रभाकर मते, प्रतिभा जगताप, शेख रब्बानी, समीर कुरेशी आदी उपस्थि

त होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow